PM Benjamin Netanyahu Dainik Gomantak
ग्लोबल

Israel Iran Tensions: ''इस्रायल पहिल्यांदाच स्वतःचं संरक्षण करण्यात अपयशी ठरला''; नेतन्याहू यांना माजी पंतप्रधानांनी घेतलं फैलावर

Israel Iran Tensions: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे.

Manish Jadhav

Israel Iran Tensions: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी पंतप्रधान यायर लॅपिड यांनी अलीकडच्या काळात घेतलेल्या निर्णयांवरुन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना घेरले. लॅपिड म्हणाले की, इराणने ज्या प्रकारे देशावर हल्ला केला तो अभूतपूर्व आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारने इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या नितीला पूर्णपणे हानी पोहोचवली आहे. इराणने इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सोडल्यानंतर दोन दिवसांनी लॅपिड यांनी नेतन्याहू यांच्यावर निशाणा साधला.

यायर यांनी X वरील त्यांच्या एका पोस्टमध्ये लिहिले की, ''नेतन्याहू सरकारच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनींविरुद्ध ज्या प्रकारचा हिंसाचार झाला तो त्यांच्या नियंत्रणाबाहेर होता. 2022 मध्ये अनेक पक्षांसोबत युती करुन सत्तेत परतलेल्या नेतन्याहू यांनी बिरीपासून किरयत शमोनापर्यंत विनाश घडवून आणला आहे. लवकरच निवडणुका व्हाव्यात, हे देशासाठी महत्त्वाचे आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने गाझा सीमेजवळील बेरी येथील किबुत्झ समुदायावर हल्ला केला आणि मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणला. यानंतर इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु झाले. इस्रायलच्या उत्तरेकडील किरियत शमोना शहरात लेबनॉन सीमेवरुन हिजबुल्लाचे दहशतवादी सातत्याने गोळीबार करत आहेत. अशा परिस्थितीत येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.''

इस्रायलच्या पंतप्रधानांवर विरोधकांचा हल्लाबोल

दरम्यान, यायर लॅपिड यांनी थेट नेतन्याहू यांच्यावर हल्ला चढवला. लॅपिड म्हणाले की, ''वेस्ट बँक आणि देशातील एकंदरीत परिस्थिती पाहता सध्याचे सरकार हटवणे गरजेचे बनले आहे. या सरकारला आपण हटवले नाही तर ते आपल्यासाठी विनाश घडवून आणतील. अशा परिस्थितीत देशात लवकरात लवकर निवडणुका व्हाव्यात आणि नेतन्याहू यांना सत्तेवरुन हटवावे.''

दुसरीकडे, इराणच्या हल्ल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू यांनी तात्काळ वॉर कॅबिनेटची बैठक बोलावली. त्यात इराणच्या हल्ल्याला इस्रायलच्या प्रत्युत्तराचा विचार करण्यात आला. इराणला चोख प्रत्युत्तर देण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे यावेळी इस्रायलने म्हटले. इराण आणि लेबनॉनच्या हल्ल्यांसोबतच, पश्चिम किनाऱ्यावरील परिस्थितीही नेतन्याहू सरकारसाठी चिंता वाढवत आहे. इस्रायल-हमास युद्ध सुरु झाल्यापासून वेस्ट बँकमध्ये हिंसाचार वाढला आहे. पॅलेस्टिनींची घरे आणि गाड्या जाळल्याच्या आणि या भागात हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT