Israel Iran Tensions: 'इस्रायली' जहाजावर इराणचा कब्जा, क्रूमध्ये 17 भारतीयांचा समावेश; व्हिडिओ व्हायरल

Israel Iran Tensions: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे.
Israel Iran Tensions
Israel Iran TensionsDainik Gomantak

Israel Iran Tensions: एकीकडे इस्त्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे तर दुसरीकडे इस्त्रायल आणि इराण यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने शनिवारी इस्रायलशी संबंध असलेले कंटेनर जहाज ताब्यात घेतले. या जहाजावर 17 भारतीय आहेत. इराणच्या या कारवाईमुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे. इराणने जहाज ताब्यात घेतल्याचे जाहीर केल्यानंतर इराणला ‘परिणाम’ भोगावे लागतील, असा इशारा इस्रायलच्या लष्कराने शनिवारी दिला आहे. "इराण स्थिती आणखी बिघडवत आहे. याचे परिणाम त्याला भोगावे लागतील," असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. इराणच्या निमलष्करी दलाच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या कमांडोनी शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका मालवाहू जहाजावर छापा टाकला आणि ते ताब्यात घेतले.

क्रूमध्ये 17 भारतीयांचा समावेश

पोर्तुगीज ध्वजांकित मालवाहू जहाज MSC Aries वर 25 क्रू पैकी 17 भारतीय आहेत. इतर क्रू सदस्यांमध्ये चार फिलिपिनो, दोन पाकिस्तानी, एक रशियन आणि एक एस्टोनियन नागरिकांचा समावेश आहे. इराणच्या सरकारी IRNA वृत्तसंस्थेने जहाज जप्त केल्याची पुष्टी केली. यापूर्वी, असोसिएटेड प्रेस (एपी) ने मिळवलेल्या व्हिडिओमध्ये कमांडो शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ हेलिकॉप्टरच्या मदतीने एका जहाजावर छापा टाकत असल्याचे दिसून आले. इराण आणि पाश्चात्य देशांमधील तणावादरम्यान घडलेल्या या घटनेसाठी पश्चिम आशियातील एका संरक्षण अधिकाऱ्याने इराणला जबाबदार धरले आहे.

Israel Iran Tensions
Israel Iran Tensions: इराण येत्या 48 तासांत इस्रायलवर हल्ला करु शकतो; वॉल स्ट्रीट जर्नलचा खळबळजनक दावा

दरम्यान, हा हल्ला व्हिडिओमध्ये पाहिला जाऊ शकतो. जहाजावरील एक क्रू सदस्य "बाहेर येऊ नका" असे म्हणताना ऐकू येत आहे.

इस्रायली अब्जाधीशाचे जहाज

वृत्तानुसार, जप्त केलेले जहाज पोर्तुगीज ध्वजांकित MSC Aries असण्याची शक्यता आहे, हे लंडनस्थित झोडियाक मेरीटाईमचे कंटेनर जहाज आहे. Zodiac Maritime हा इस्रायली अब्जाधीश Eyal Ofer च्या Zodiac Group चा भाग आहे.

Israel Iran Tensions
Israel-Iran Tensions: सीरियातील इराणी दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडरसह 6 जण ठार

इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढलेल्या तणावादरम्यान ही घटना घडली आहे, विशेषत: सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासावर इस्रायलच्या संशयित हल्ल्यानंतर. इराणने जहाज ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे. इराणने 2019 पासून जहाजे ताब्यात घेण्याच्या अनेक घटना घडवून आणल्या आहेत. तो आपल्या आण्विक कार्यक्रमाला झपाट्याने पुढे नेत आहे आणि पाश्चात्य देशांसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान जहाजांवर अनेक हल्ले झाले आहेत. ओमानचे आखात होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे, पर्शियन गल्फचा एक अरुंद भाग ज्यातून 20 टक्के जागतिक तेलाची वाहतूक केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com