Hamas Teddy bear Bomb|Israel Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: टेडी बेअरमध्ये बॉम्ब लपवून हमासकडून हल्ले, इस्रायलने शेअर केला व्हिडिओ

Israel Hamas War: आता इस्त्रायल मानवतेच्या हितासाठी युद्ध पुकारत आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या बाजूने युक्तिवाद करण्यात व्यस्त आहे. ते जे काही करताहेत ते हमासचा नाश करण्यासाठी आहे.

Ashutosh Masgaunde

Attacks by Hamas hiding bombs in teddy bears, Israel shares video:

पॅलेस्टाईनमधील गाझा येथे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला (Israel Hamas War) 2 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. हे युद्ध हमासच्या हल्ल्याने सुरू झाले आहे. हमासने ते सुरू केले पण पॅलेस्टाईनमधील सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

आता इस्त्रायल मानवतेच्या हितासाठी युद्ध पुकारत आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्या बाजूने युक्तिवाद करण्यात व्यस्त आहे. ते जे काही करताहेत ते हमासचा नाश करण्यासाठी आहे.

इस्रायलचे म्हणणे आहे की, हमास सामान्य लोकांचा ढाल म्हणून वापर करत आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने व्हिडीओ आणि फोटो जारी केले आहेत ज्यामध्ये हमास टेडी बेअरमध्ये बॉम्ब लपवून हल्ले करत आहे.

इस्रायलकडून सातत्याने होत असलेल्या बॉम्बफेकीचाही निषेध केला जात आहे. त्याच संदर्भात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो यांनीही इस्रायलवर सातत्याने होत असलेल्या बॉम्बफेकीचा निषेध केला.

जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार गाझामध्ये 17 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. तर 47 हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो यांनी सुरक्षा परिषदेला सांगितले की, गाझामधील मानवतावादी मदत पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका आहे. आतापर्यंत UN चे 130 कर्मचारी मारले गेले आहेत.

अँटोनियो म्हणाले, हमासच्या हल्ल्याची शिक्षा पॅलेस्टाईनच्या सामान्य जनतेवर लादणे चुकीचे आहे. हे कोणत्याही प्रकारे समर्थनीय होऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाकडून करण्यात येत असलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

गाझामध्ये युएईकडून युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, मात्र अमेरिकेने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले.

दुसरीकडे फ्रान्सने ताबडतोब युद्धबंदीच्या बाजूने म्हणजेच युद्ध थांबवण्यासाठी मतदान केले. हमासने युद्ध का सुरू केले यावर अमेरिका ठाम राहिली.

दरम्यान, इस्रायल संरक्षण दलाचा दावा आहे की, हमास सदस्यांनी नागरिकांना मारहाण केली आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेली मानवतावादी मदत चोरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT