Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak

Israel-Hamas War: विराम संपला युद्ध सुरु! हमासने इस्रायलवर डागली 50 रॉकेट, इस्रायली सैन्याच्या कारवाईत 109 जणांचा मृत्यू

Israel Hamas 2nd phase War Latest Update: इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले आहे. मात्र, हे युद्ध पुन्हा एकदा हमासने सुरु केले.
Published on

Israel Hamas 2nd phase War Latest Update: इस्रायल आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरु झाले आहे. मात्र, हे युद्ध पुन्हा एकदा हमासने सुरु केले. हमासने मध्य इस्रायलवर 50 हून अधिक रॉकेट डागले. यानंतर, प्रत्युत्तरादाखल इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यात 109 पॅलेस्टिनी ठार झाल्याची बातमी आहे. शेकडो मुले जखमी झाली आहेत. गाझा येथून रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलाची राजधानी तेल अवीवमध्ये बैठक झाली. गाझामधील कारवाया तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धात आतापर्यंत 14 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, हमासला आणखी ओलीस ठेवलेले लोक सोडायचे नाहीत. या कारणास्तव युद्धबंदी आणखी वाढवता आली नाही. महिलांना सोडण्यात आले नाही, असा आरोप इस्रायलने केला. दरम्यान, युद्धबंदी संपल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलला रवाना झाले.

Israel-Hamas War
Israel-Hamas War: हवेत गनपावडरचा वास, धुराचे ढग... आठवडाभराच्या शांततेनंतर गाझामध्ये रक्तरंजित खेळ सुरु; 1 तासात 29 जणांचा मृत्यू!

युद्धबंदी दरम्यान गाझामध्ये 1132 ट्रक मदत सामग्री पोहोचली

दुसरीकडे, 7 दिवसांच्या युद्धबंदीदरम्यान हमासने 110 इस्रायली ओलीसांची सुटका केली आहे. युद्धबंदीच्या शेवटच्या दिवशी 8 ओलिसांची सुटका करण्यात आली. त्या बदल्यात इस्रायलने 30 पॅलेस्टिनींना सोडले, यामध्ये 22 मुले आणि 8 महिलांचा समावेश होता. युद्धबंदीदरम्यान, 1132 ट्रक मदत घेऊन गाझाला पोहोचले. रेड क्रेसेंट सोसायटीच्या म्हणण्यानुसार, युद्धबंदीदरम्यान दररोज 220 ट्रक गाझामध्ये दाखल झाले. युद्धापूर्वी 500 ट्रक मदतीला आले होते. मात्र, तेथील लोकांसाठी ही मदत अपुरी आहे.

दरम्यान, दुबईत सुरु असलेल्या COP-28 शिखर परिषदेत इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष इसाक हेर्जोग यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. दुसरीकडे, हमासने इस्रायलला या शिखर परिषदेत सहभागी होण्यापासून रोखण्याचे आवाहन केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com