Pakistan Defense Minister: पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. महागाई शिगेला पोहोचली आहे. भाकरी आणि पाण्यासाठीही अडचणी आहेत. या पार्श्वभुमीवर आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याने पाकिस्तानातील परिस्थितीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. आसिफ यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तान दिवाळखोर झाल्याचे मान्य केले आहे. पाकिस्तान गेल्या काही काळापासून जगभरात कर्ज मागत फिरत आहेत. पाकचा नेहमी मदत करणाऱ्या अमेरिका आणि सौदी अरेबियाने यापुर्वीच पाकिस्तानला मदत करण्यास नकार दिला आहे.
त्यातच नुकतेच जागतिक नाणे निधी (आयएमएफ)ने देखील पाकिस्तानला कर्ज मंजुर केले नाही. त्यामुळे आधीच विपन्नावस्थेत असलेल्या पाकिस्तानची स्थिती आणखी वाईट बनली आहे. पाकिस्तानच्या चलनाने निचांक गाठला आहे. एवढे सगळे होत असतानाही, पाकिस्तानच्या कुठल्याही राजकीय नेत्याने पाकिस्तानच्या स्थितीबाबत काहीही मान्य केलेले नव्हते.
पाकिस्तान दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात होते. पण आता खुद्द संरक्षण मंत्र्यांनीची पाकिस्तान दिवाळखोर झाल्याची कबुली दिली आहे.
ख्वाजा आसिफ म्हणाले की, पाकिस्तान दिवाळखोर झाला आहे. आपण आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे. आपण दिवाळखोर देशाचे रहिवासी आहोत. आसिफ यांनी सियालकोटमधील एका खासगी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ही टिप्पणी केली.
आपल्या भाषणादरम्यान ख्वाजा आसिफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दहशतवाद पाकिस्तानात परत आणल्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, आता दहशतवाद हेच आमचे नशीब बनले आहे. मंदी येईल असे म्हटले जात होते, परंतु ती आधीच आली आहे. आपल्या सर्व अडचणींचे उत्तर देशातच आहे पण आपण आयएमएफकडे पाहत आहोत.
वास्तविक, पाकिस्तानकडे आयातीच्या दृष्टीने केवळ तीन आठवड्यांचे परकीय चलन शिल्लक राहिले आहे. पाकिस्तानची संपूर्ण आशा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मिळणाऱ्या मदतीवर आहे. दरम्यान, माजी गुंतवणूक बँकर युसूफ नजर म्हणाले की, जर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या तीव्र घसरणीला ब्रेक लावायचा असेल तर अर्थमंत्री इशाक दार यांना पदावरून हटवले पाहिजे. असे केले नाही तर येणाऱ्या वाईट दिवसांसाठी तयार राहावे लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.