Nawaz Sharif: कारगिल हल्ल्याबाबत नवाझ शरीफ यांचा मोठा खुलासा; म्हणाले...

Pakistan Former PM Nawaz Sharif: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाचा संपूर्ण प्लॅन समोर आला आहे.
Pakistan Former PM Nawaz Sharif
Pakistan Former PM Nawaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Former PM Nawaz Sharif: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाचा संपूर्ण प्लॅन समोर आला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कारगिल युद्धाच्या प्लॅनचा संपूर्ण खुलासा केला आहे. नवाझ शरीफ म्हणाले की, ''मी कारगिल हल्ल्याच्या बाजूने नव्हतो. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करावा अशी त्यांची इच्छा नव्हती. पण कारगिल प्लॅनला विरोध केल्यामुळे 1999 मध्ये त्यांची हकालपट्टी करण्यात आली.'' पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शनिवारी म्हणाले की, 'जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल दुर्घटनेच्या निषेधार्थ 1999 मध्ये त्यांना सरकारमधून बेदखल केले होते.'

दरम्यान, भारत आणि इतर शेजारी देशांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे महत्त्व नवाज यांनी अधोरेखित केले. परंतु परवेझ मुशर्रफ कोणत्याही किंमतीत कारगिलवर हल्ला करायचाच होता. नवाज यांनी सांगितले की, 'मी त्यांच्या प्लॅन विरोध केला होता.' तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान राहिलेले पुढे शरीफ म्हणाले की, ''जेव्हा मी कारगिल प्लॅन विरोध केला होता आणि असे होऊ नये असे म्हटले होते... तेव्हा त्यांनी (जनरल परवेझ मुशर्रफ) मला हाकलून दिले होते. नंतर मी जे बोललो ते खरे ठरले.”

Pakistan Former PM Nawaz Sharif
Nawaz Sharif: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय, जाणून घ्या पुढे काय होणार?

पीएम मोदी आणि बाजपेयी यांचा उल्लेख केला

नवाज म्हणाले की, 'माझ्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात भारताच्या दोन पंतप्रधानांनी पाकिस्तानला भेट दिली. पीएम मोदी आणि माजी पंतप्रधान वाजपेयी साहेब लाहोरला आले होते.' शरीफ पुढे म्हणाले की, “आपल्याला भारत, अफगाणिस्तान आणि इराणसोबतचे संबंध सुधारायचे आहेत. आपल्याला चीनशी मजबूत संबंध निर्माण करण्याची गरज आहे.” आर्थिक विकासाच्या बाबतीत पाकिस्तान भारताच्या मागे पडल्याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com