Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासला शस्त्रे पुरवणारा तस्कर ठार

Israel-Hamas War: इस्रायल डिफेन्स फोर्स, अर्थात IDF ने हमासला शस्त्रास्त्रे पुरवणारा तस्कर हसन अत्राशला ठार केले आहे.

Manish Jadhav

Israel-Hamas War: इस्रायल-हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्रायल डिफेन्स फोर्स, अर्थात IDF ने हमासला शस्त्रास्त्रे पुरवणारा तस्कर हसन अत्राशला ठार केले आहे. हसन हा हमास आणि इतर दहशतवादी गटांना शस्त्रे पुरवत असे, ज्याचा मृत्यू हा हमाससाठी मोठा धक्का आहे, असे इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हमासचा हा शस्त्र विक्रेता इस्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील रफाह शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. इस्रायली लष्कराच्या लढाऊ विमानांनी शुक्रवारी रफाहमध्ये हवाई हल्ले केले, ज्यामध्ये इस्रायलने हसनला ठार केल्याचा दावा केला.

इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हसनने गाझा पट्टी तसेच वेस्ट बँकमध्ये विविध देशांतून शस्त्रास्त्रांची तस्करी केली होती. आयडीएफने शनिवारी हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये एक कार गर्दीमधून जात असल्याची दिसत आहे. यानंतर अचानक कारमधून धूर निघू लागला. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, हसनला लक्ष्य करुन हा हल्ला करण्यात आला. ज्यात त्याचा मृत्यू झाला.

4 हमास कमांडर ठार: IDF

इस्रायली लष्कराचे अरब प्रवक्ते अविचाई अद्रेई यांनी ट्विटरवर (एक्स) लिहिले की, आयडीएफने हमास ब्रिगेडच्या सात वरिष्ठ कमांडरपैकी चार जणांना यशस्वीरित्या लक्ष्य केले. आता केवळ तीन वरिष्ठ कमांडर चेन ऑफ कमांडमध्ये राहिले आहेत. तीन कमांडरमध्ये हमासच्या अल-कसाम ब्रिगेडचा कमांडर अल-दिन अल-हद्दाद आणि दोन बटालियन कमांडर इमाद अस्लीम आणि जाबेर हसन अझीझ यांचा समावेश आहे. आयडीएफने म्हटले आहे की, युद्धादरम्यान त्यांचे लक्ष हमासच्या प्रमुख कमांडरांना गाझामधून बाहेर काढण्यावर आणि त्यांच्यावर लक्ष्यित हल्ले करण्यावर होते. हमासविरुद्धच्या युद्ध मोहिमेचा हा एक भाग आहे.

इस्रायली लष्कराने पुढे असेही म्हटले की, गेल्या एका आठवड्यात त्यांनी हमास आणि इतर संघटनांच्या 200 हून अधिक दहशतवाद्यांना अटक केली. त्यांना पकडून चौकशीसाठी इस्रायलमध्ये आणण्यात आले आणि नंतर तुरुंगात पाठवण्यात आले. आयडीएफचे म्हणणे आहे की, युद्ध सुरु झाल्यापासून आतापर्यंत हमास आणि इस्लामिक जिहाद या दहशतवादी गटांशी संबंधित 700 हून अधिक दहशतवाद्यांना अटक करुन इस्रायलच्या तुरुंगात धाडण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT