Israel-Hamas War: इस्रायलने 24 तासांत गाझामध्ये 200 हून लोक मारले, बायडन यांनी घाईघाईने नेतन्याहू यांना केला फोन

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलची लष्करी कारवाई सुरुच आहे.
Israel-Hamas War
Israel-Hamas WarDainik Gomantak

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलची लष्करी कारवाई सुरुच आहे. इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. हमास शासित गाझाच्या आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, गेल्या 24 तासांत इस्रायली बॉम्बहल्ल्यात 201 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे, युद्धाच्या सुरुवातीपासून मृतांची संख्या 20,258 वर पोहोचली आहे, ज्यात मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही शनिवारी आपल्या 5 सैनिकांना ठार केल्याची माहिती दिली आहे. इस्रायलच्या लष्करी प्रमुखांच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने उत्तर गाझा मोठ्या प्रमाणात काबीज केला आहे आणि आता त्यांचे लक्ष दक्षिण गाझाकडे आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुन्हा एकदा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. स्वत: बायडन यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. बायडन म्हणाले की, 'नेतन्याहू यांच्याशी त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली.' त्यांनी याला एक प्रकारचे खाजगी संभाषण म्हटले. युद्धविरामाशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात बायडन म्हणाले की, 'मी युद्धविराम मागितला नाही.' व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'राष्ट्राध्यक्षांनी मानवतावादी मदतीला पाठिंबा देणाऱ्यांसह नागरी लोकसंख्येचे संरक्षण करण्याच्या गरजेवर भर दिला. युद्धग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.'

Israel-Hamas War
Israel-Hamas War: भारताकडे येणाऱ्या इस्रायली जहाजावर ड्रोन हल्ला, भारतीय तटरक्षक दलाचे ICGS विक्रम रवाना

उरलेल्या ओलिसांची सुटका करण्याचा मार्ग निघेल का?

व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे की, बायडन आणि नेतन्याहू यांनी इस्रायली लष्करी कारवाईच्या उद्देशावर चर्चा केली. उर्वरित सर्व ओलीसांची सुटका करण्यावरही भर देण्यात आला. त्याचवेळी, नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, 'युद्ध संपेपर्यंत त्यांचे लष्करी ऑपरेशन सुरुच राहील, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे.' या वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने गाझा सीमा ओलांडून अचानक इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे 1,140 लोक मारले गेले. यानंतर इस्रायलने हमासचा नाश करण्याची शपथ घेतली आणि त्याविरोधात मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरु केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com