Israel-Hamas War: भारताकडे येणाऱ्या इस्रायली जहाजावर ड्रोन हल्ला, भारतीय तटरक्षक दलाचे ICGS विक्रम रवाना

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
Israeli ship
Israeli shipDainik Gomantak

Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अरबी समुद्रात इस्रायलशी संलग्नित जहाजावर ड्रोनने हल्ला करण्यात आला. रिपोर्टनुसार, हा हल्ला गुजरातच्या वेरावळपासून 200 किलोमीटर नैऋत्येला करण्यात आला. हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली. मात्र वेळीच आग विझवण्यात आली. सौदी अरेबियाहून हे जहाज मंगळूरकडे येत होते. रिपोर्टनुसार, आग विझवण्यात आली असली तरी कामकाजावर परिणाम झाला आहे. जहाजामध्ये केमिकल प्रोडक्ट्स आहेत. ब्रिटिश सागरी सुरक्षा फर्म एम्ब्रेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या पश्चिम किनार्‍याजवळील अरबी समुद्रात इस्त्रायलशी संलग्नित व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. त्यामुळे जहाजाला आग लागली.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, आंब्रे यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, भारतातील वेरावळपासून 200 किलोमीटर नैऋत्येला घडलेल्या या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जहाजाचे काही संरचनात्मक नुकसान झाले आहे, ज्यामुळे त्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

Israeli ship
Israel-Hamas War: ''सरेंडर करा नाहीतर मरण्यासाठी तयार राहा...'', नेतन्याहू यांचा हमासला अल्टिमेटम

दरम्यान, भारतीय नौदल या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नौदलाच्या अधिकाऱ्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घटना घडलेल्या दिशेने भारतीय नौदलाच्या युद्धनौका जात आहेत. मात्र, इस्रायली जहाजावर हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे जेव्हा अलीकडेच इराण समर्थित हुथी बंडखोरांनी रेड सी मधून जाणाऱ्या इस्रायली जहाजाला लक्ष्य करण्याचा इशारा दिला होता. यापूर्वी हुथी बंडखोरांनी रेड सी मधून जाणाऱ्या अनेक व्यापारी जहाजांना लक्ष्य केले. त्यामुळे कमर्शियल जहाजांना त्यांचे मार्ग बदलण्यास भाग पाडले जात आहे. नोव्हेंबरमध्ये, हुथी बंडखोरांनी रेड सी मधून एका मालवाहू जहाजाचेही अपहरण केले होते.

Israeli ship
Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायलचं मोडलं कंबरडं, हमासनं मोसादाची काढली हवा

ICGS विक्रम हल्ल्याच्या तपासासाठी पाठवण्यात आले

भारतीय तटरक्षक जहाज ICGS विक्रम हे इस्रायली जहाजावरील हल्ल्याच्या तपासासाठी पाठवण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, ज्या जहाजावर हल्ला झाला त्या जहाजाचे नाव 'एमव्ही केम प्लुटो' आहे. जहाजामध्ये केमिकल प्रोडक्ट्स आहेत. सौदी अरेबियाहून हे जहाज मंगळूरकडे येत होते. ICGS विक्रम भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. संरक्षण अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, या भागातील सर्व जहाजांना मदत देण्यासाठी ICGS विक्रम हे जहाज तैनात केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com