ग्लोबल

Israel Air Strikes Video: हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा इस्रायलने घेतला बदला; लेबनॉनवर केला जोरदार हवाई हल्ला

Israel Air Strikes: इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांच्या विमानांनी हिजबुल्लाच्या ताब्यात असलेल्या दक्षिण लेबनीज शहरातील लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले.

Manish Jadhav

Israel Air Strikes Video: एकीकडे इस्रायल गाझामध्ये हमास या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे त्याला इतर सामरिक आघाड्यांवरही शत्रूंचा सामना करावा लागत आहे. हिजबुल्लाकडून इस्रायलवर सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. या हल्ल्यांना इस्रायलही प्रत्युत्तर देत आहे. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील मास अल जबल शहरात जोरदार हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

इस्रायली हल्ला

दरम्यान, लेबनॉनच्या सरकारी माध्यमांनी या हवाई हल्ल्यांची माहिती दिली आहे. लेबनॉनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने हा हवाई हल्ला तेव्हा केला जेव्हा शहरातील रहिवासी पूर्वीच्या हल्ल्यामुळे त्यांच्या दुकानांचे आणि घरांचे किती नुकसान झाले हे पाहत होते. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले आहेत. दरम्यान, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांच्या विमानांनी हिजबुल्लाच्या (Hezbollah) ताब्यात असलेल्या दक्षिण लेबनीज शहरातील लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले.

हिजबुल्लाने हल्ला केला

हिजबुल्लाने रविवारी दावा केला होता की, त्यांनी लेबनॉन-इस्रायल सीमेजवळ इस्रायली लष्करी ठिकाणांना लक्ष्य करुन 10 हल्ले केले होते. या हल्ल्यांबाबत इस्रायली लष्कराने सांगितले होते की, सुमारे 40 क्षेपणास्त्रे डागण्यात आली असली तरी यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

इस्रायलची कारवाई सुरुच आहे

हमासने (Hamas) गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता, त्यानंतर इस्रायली सैन्याने दहशतवादी गटाचा खात्मा करण्यासाठी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत 34 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 75 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. सध्या युद्ध सुरु असून ते थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT