Israel Air Strikes Video: ''लिमीटमध्ये रहा, अन्यथा...''; हिजबुल्लाच्या ठिकाणांवर इस्रायलने पुन्हा केला हवाई हल्ला

Israel Air Strikes in Southern Lebanon: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Israel Air Strikes
Israel Air Strikes Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel Air Strikes in Southern Lebanon: इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, लेबनॉनला चोख प्रत्युत्तर देत इस्रायलने हवाई हल्ला केला आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यात आला. दरम्यान, या हवाई हल्ल्यात सुमारे 14 लोक जखमी झाले आहेत. यासह हिजबुल्लाचे मोठे नुकसान झाले आहे.

हवाई हल्ला करुन इस्रायलने लेबनॉनला लिमीटमध्ये राहण्याचा इशारा दिला, अन्यथा आपल्या शत्रूंचा नाश कसा करायचा हे इस्रायलला माहीत असल्याचे म्हटले आहे. हवाई हल्ल्यानंतर इस्रायलच्या मुख्य लष्करी प्रवक्त्याने हे वक्तव्य जारी केले आहे. ते पुढे म्हणाले की, हमासला पाठिंबा देऊन लेबनॉन चांगले करत नाहीये. या पाठिंब्याची किंमत त्याला चुकवावी लागेल.

इस्रायलवरील ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी रात्री उशिरा हा हल्ला इस्त्रायली सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण लेबनॉनच्या सिडोन भागात झाला. लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाने इस्रायलमध्ये सोडलेल्या ड्रोनला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. या हल्ल्यात जवळपास 14 लोक जखमी झाले असून त्यात बहुतांश सीरियन आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सिडोनमध्ये अचानक मोठा स्फोट झाला आणि गाझियामध्ये धुराचे लोट पसरले. काळ्या धुराने आकाश व्यापले होते. अचानक हवाई हल्ला करुन इस्रायलने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

Israel Air Strikes
Israel-Hamas War: कतारची मध्यस्थी फेल! इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम होऊ शकला नाही...

हमासला पाठिंबा देण्याची किंमत हिजबुल्लाने चुकवली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलचे लक्ष्य लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्ला आहे. वास्तविक, लेबनॉनने काही दिवसांपूर्वीच इस्रायल-हमास युद्धात उडी घेतली होती. हमासला पाठिंबा देत लेबनीज दहशतवादी (Terrorist) गट हिजबुल्लाने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इस्रायल सातत्याने लेबनॉनवर हल्ले करत आहे.

Israel Air Strikes
Israel-Hamas War: 7 ऑक्टोबरचा कट रचणाऱ्या हमास कमांडरचा इस्रायलकडून व्हिडिओ शेअर; ''त्याला जिवंत किंवा मृत पकडल्याशिवाय...''

इस्रायलच्या (Israel) हल्ल्यात आतापर्यंत 150 हून अधिक हिजबुल्लाचे दहशतवादी आणि 35 नागरिक ठार झाले आहेत. काल रात्री इस्रायलने पुन्हा लेबनॉनवर हल्ला करुन पराभव न स्वीकारण्याचा संदेश दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

IDF Claims 250 Terrorists Killed
IDF Underground Operations Lebanon
Israel attacks Lebanon
Ali Larijani Targeted by Israel
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com