Iran-America Tension Dainik Gomantak
ग्लोबल

Iran-America Tension: इराणच्या 'सर्वात शक्तिशाली ठिकाणी' मोठा स्फोट, अमेरिकेसोबतचा वाढू शकतो तणाव

Iran-America Tension: इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट झाला. इराणच्या एव्हिएशन आणि स्पेस फोर्सच्या मुख्यालयात हा स्फोट झाला.

Manish Jadhav

Iran-America Tension: इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट झाला. इराणच्या एव्हिएशन आणि स्पेस फोर्सच्या मुख्यालयात हा स्फोट झाला. स्फोटानंतर मुख्यालयातून ज्वाळा उठताना दिसत होत्या. या भीषण स्फोटामुळे मध्यपूर्वेत आणखी संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे. गाझा पट्टी आणि लेबनॉन सीमेवर सुरु असलेल्या युद्धादरम्यान या स्फोटामुळे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष वाढू शकतो.

दरम्यान, हा स्फोट इतका शक्तिशाली होता की मुख्यालयातून बराच वेळ ज्वाळा उठत राहिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, एव्हिएशन आणि स्पेस फोर्सच्या या मुख्यालयातून क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा पुरवठा करण्यात आला होता. या ठिकाणाहून इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध युद्ध लढणाऱ्या हमास, हिजबुल्ला आणि हुथी बंडखोरांना घातक शस्त्रे पाठवली जात असल्याचा संशय आहे. मात्र, या स्फोटाचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. हा अपघात आहे की षड्यंत्र आहे याबाबत इराणने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र इस्रायल-हमास युद्धादरम्यान अशा घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिका आणि इस्रायलने अलीकडेच इराणला प्रॉक्सी गटांबद्दल इशारा दिला आणि इराणला आगीशी खेळणे थांबवण्यास सांगितले.

गॅस स्टेशनवर सायबर हल्ला

दरम्यान, तणावाच्या वातावरणात इस्रायली हॅकर्संनी इराणच्या गॅस स्टेशनवर सायबर हल्ला केला. इराणच्या सुमारे 60 ते 70 टक्के गॅस स्टेशनवर काम थांबल्याने एकच गोंधळ उडाला. दुसरीकडे, इराणने इस्रायल आणि अमेरिकन हॅकर्सवर गॅस स्टेशनवर सायबर हल्ल्याचा आरोप केला. इराणी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या घटनेमुळे सोमवारी देशभरातील केवळ 30 टक्के गॅस स्टेशन कार्यरत होते.

टाइम्स ऑफ इस्रायलने या सायबर हल्ल्यासाठी इस्रायली हॅकर्स ग्रुप 'गोंजेश्को दारांदे'ला जबाबदार धरले आहे. देशात एकूण 33 हजार गॅस स्टेशन आहेत. मात्र गॅस पुरवठ्यातील अडचणींमुळे गॅस स्टेशनवर दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या काळात साठा आणि पुरवठा डेटामध्ये प्रचंड तफावत दिसून आली. 2022 मध्ये देखील, इस्त्रायली हॅकर्सच्या याच गटाने इराणची एक मोठी स्टील कंपनी हॅक केली होती. 2000 च्या उत्तरार्धात, स्टक्सनेट कॉम्प्युटर व्हायरसने इराणच्या आण्विक केंद्रातील सेंट्रीफ्यूजमध्ये व्यत्यय आणला. अलीकडच्या काळात इराणमध्ये अनेक सायबर हल्ले झाले आहेत. आता इस्रायलविरुद्ध प्रॉक्सी युद्ध छेडण्याच्या आरोपांदरम्यान, इराणवर अशा हल्ल्यांची भीती वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT