Donald Trump USA, Iran Israel War X
ग्लोबल

Iran Israel War: इराण-इस्राईल संघर्षात अमेरिकेची उडी, 3 अणुकेंद्रांवर बाँबवर्षाव; रिव्हॉल्युशनरी गार्डकडून 40 क्षेपणास्त्रांचा मारा

Donald Trump: संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणमधील तीन अणुकेंद्रांवर बाँब टाकले. या हल्ल्यात या तिन्ही अणुकेंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

Sameer Panditrao

तेहरान/वॉशिंग्टन: इराण-इस्राईल संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणमधील तीन अणुकेंद्रांवर बाँब टाकले. या हल्ल्यात या तिन्ही अणुकेंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला.

यावर, इराणनेही प्रत्युत्तर देताना, ‘आता चर्चा करण्याची वेळ संपली असून आमचे संरक्षण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे,’ असा इशारा दिला. त्यांनी इस्राईलवर क्षेपणास्त्रांचा मारा करत काही प्रमाणात नुकसानही घडवून आणले.

या घडामोडींमध्ये प्रादेशिक युद्धाचा भडका उसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इस्राईलच्या हल्ल्यांना खुला पाठिंबा देतानाच इराणवर अणुकरार करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जात होता. या युद्धात थेट हस्तक्षेप करायचा की नाही, हे दोन आठवड्यात ठरवू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले होते.

प्रत्यक्षात दोन दिवसही वाट न पाहता त्यांनी आज इराणमधील नातांझ, फोर्दो आणि इस्फहान या केंद्रांवर बाँबफेक केली. जमिनीखाली असलेल्या फोर्दो अणुकेंद्रावर मारा करण्यासाठी अमेरिकेने ‘बी-२’ बाँबर विमानातून बंकर बस्टर या साडे तेरा हजार किलो वजनाच्या बाँबचा वापर केला.

इस्राईलवर हल्ले

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काही तासांतच इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड या निमलष्करी दलाने इस्राईलवर ४० क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात इस्राईलमधील ८० हून अधिक जण जखमी झाले. तेल अविवमधील काही इमारती आणि रस्त्यांचेही या हल्ल्यात नुकसान झाले. मात्र, ज्या यंत्रणेद्वारे इराणने आज क्षेपणास्त्रांचा मारा केला, ती यंत्रणाच नंतर हल्ला करत नष्ट केल्याचा दावा इस्राईलने केला आहे.

तेलाचे दर वाढणार

अमेरिकेने थेट अणुकेंद्रांवरच हल्ला केल्याने इराणने अखेर हुकुमी अस्त्र बाहेर काढले आहे. जगातील ३० टक्के कच्च्या तेलाची आणि एक तृतियांश नैसर्गिक वायूची वाहतूक होणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यास इराणच्या संसदेने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा समितीने अद्याप ‘हिरवा कंदील’ दिलेला नाही. मात्र, तसा निर्णय झाल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती भडकू शकतात.

तणाव कमी करा!

अमेरिकेने हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी संवाद साधत तणाव कमी करण्याचे तसेच शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT