Cluster Bomb: 'क्लस्टर बाँब'मुळे जगभरात चिंता! इराणने वापर केल्यामुळे वाढला धोका; शेकडो स्फोटकांमुळे होतो मोठा विध्वंस

Iran Israel Conflict: इस्राईलविरोधातील संघर्षात इराणने प्रथमच क्लस्टर बाँबचा वापर केला आहे. अल्पावधीत मोठी जीवितहानी घडवून आणण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जातो.
Iran cluster bomb Israel conflict
Iran cluster bomb Israel conflictDainik Gomantak
Published on
Updated on

तेहरान: इस्राईलविरोधातील संघर्षात इराणने प्रथमच क्लस्टर बाँबचा वापर केला आहे. अल्पावधीत मोठी जीवितहानी घडवून आणण्यासाठी या शस्त्राचा वापर केला जातो. इस्राईलच्या लष्कराने या हल्ल्याला दुजोरा दिल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाची चिंता वाढली आहे.

भविष्यात इराणकडून आणखी अशाच प्रकारच्या संहारक शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त होते आहे. इस्राईलच्या मध्यवर्ती भागाला लक्ष्य करून या बाँबद्वारे हल्ला करण्यात आला होता.

हा बाँब कसा फुटतो?

क्लस्टर बाँबचा हवेत स्फोट झाल्यानंतर त्यातून आणखी शेकडो स्फोटके बाहेर पडतात आणि ती मोठ्या भूप्रदेशात विध्वंस घडवून आणतात. एकाच वेळी फुटणाऱ्या बाँबपेक्षा हे शस्त्र अधिक घातक मानले जाते. विशेष म्हणजे ही स्फोटके स्वयंचलित नसतात.

Iran cluster bomb Israel conflict
Iran Israel War: इराणचे 120 क्षेपणास्त्र प्रक्षेपक नष्ट केले! इस्राईलच्या प्रवक्त्यांचा दावा; सरकारी वृत्तवाहिनीवरही झाला हल्ला

जमिनीवर पडल्यानंतर त्यांचा अल्पावधीत स्फोट होतो. यानंतरही काही स्फोटके तशीच न फुटलेल्या अवस्थेत पडून राहतात त्यामुळे त्यांचा नंतर स्फोट होऊन त्यात नागरिक जखमी होण्याचा धोका असतो. लोकसंख्येची अधिक घनता असलेला भूप्रदेश, घरे आणि पायाभूत सुविधांचा या बाँबमुळे विध्वंस होतो.

Iran cluster bomb Israel conflict
Iran Israel War: इस्राईलचा हल्लाबोल! 3 कमांडर ठार, आण्विक संशोधन केंद्राला दणका; क्षेपणास्त्रे डागत इराणचे प्रत्युत्तर

रशिया- युक्रेन युद्धात वापर

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने हा बाँब झेलेन्स्की यांना दिला होता, त्यावरूनही बराच वादंग झाला होता. युक्रेननेही रशियाकडून क्लस्टर बाँबचा वापर झाल्याचा आरोप केला होता.

क्लस्टर बाँबमुळे मोठ्या भूप्रदेशात विध्वंस होतो. नागरी भागामध्ये तो फुटला तर असंख्य स्फोटके लगतच्या परिसरामध्ये विखुरली जातात त्यामुळे देखील आणखी जीवितहानी होऊ शकते.

डॅरिल किमबॉल, कार्यकारी संचालक, शस्त्र नियंत्रण संघटना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com