Israel-Hamas War Dainik Gomantak
ग्लोबल

Israel-Hamas War: हिजबुल्लाने दिली धमकी… इस्रायलने हमास प्रमुखाच्या घरावर केला हल्ला!

Manish Jadhav

Hezbollah Threatened Israel Attacked House of Hamas Chief Ismail Haniye: इस्रायल आणि हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेले युद्ध भीषण रुप धारण करत आहे. हमासच्या बाजूने लढणाऱ्या हिजबुल्ला या इस्लामिक दहशतवादी संघटनेने इस्रायल आमचा हल्ला नेहमी लक्षात ठेवेल, अशी धमकी दिली होती.

या धमकीला इस्रायलने आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. अल-अक्सा रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलने हमास प्रमुख इस्माइल हनीये याच्या घरावर हल्ला केला आहे.

हल्ल्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले होते की, जोपर्यंत हमास इस्रायली ओलीस सोडत नाही तोपर्यंत हमासवरील हल्ले सुरुच राहतील.

न्यूज साइट द सनने दिलेल्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही युद्धबंदीचे आवाहन फेटाळून लावले आहे. जोपर्यंत हमास 240 इस्रायली ओलीस परत करत नाही तोपर्यंत हल्ले सुरुच राहतील, असे ते म्हणाले. याआधी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनीही युद्धबंदीचे आवाहन केले होते, असे वृत्त आहे.

इस्रायली लोकांच्या मृत्यूबद्दल हिजबुल्लाला आनंद झाला

दुसरीकडे, नेतान्याहू म्हणाले की इस्रायल तात्पुरत्या युद्धविरामाची कोणतीही चर्चा नाकारतो, ज्यामध्ये आमच्या ओलीसांच्या परतीचा समावेश नाही. दुसरीकडे, हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाहने हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचे कौतुक केले.

या हल्ल्यांमध्ये 1,400 लोक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. युद्ध सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या भाषणात त्याने हमासची कृती योग्य आणि शहाणपणाची असल्याचे म्हटले होते. गाझामधील युद्धाला अमेरिका जबाबदार असल्याचेही त्याने म्हटले आहे.

तसेच, नसराल्लाहने येमेन आणि इराकमधील इराण समर्थित सैन्याचेही आभार मानले. येमेनमधील हौथी बंडखोर इस्रायलवर ड्रोन हल्ले करत आहे, तर शिया इराकी मिलिशिया इराक आणि सीरियामध्ये अमेरिकन सैन्याला लक्ष्य करत आहेत. नसराल्लाहने इशारा दिला की, हिजबुल्लाह सर्व पर्यायांसाठी तयार आहे.

आम्ही 8 ऑक्टोबरलाच या लढ्यात सहभागी झालो

तो पुढे म्हणाला की, काही लोक म्हणतात की, युद्धात उतरण्यासंबंधी मी घोषणा करणार आहे. त्यावर तो म्हणाला की, आम्ही 8 ऑक्टोबरलाच या युद्धात उतरलो आहोत. दुसरीकडे, विशाल स्क्रीनवर त्याचे भाषण पाहण्यासाठी हजारो लोक एका चौकात जमले असताना बेरुतमध्ये गोळीबार झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT