Israel Hamas War Video: हमास आणि इस्रायल यांच्यात मागील एक महिन्यापासून युद्ध सुरु आहे. इस्रायलने 07 ऑक्टोबर 2023 रोजी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. दरम्यान, हमास दशतवाद्यानी दक्षिण इस्रायलमधील एका संगीत कॉन्सर्टवर हल्ल्या करुन केलेल्या हत्याकांडाचा भीषण व्हिडिओ आता समोर आला आहे. यात 260 जणांची हत्या हमास दशतवाद्यानी केली आहे.
दोन मिनिट आणि 52 सेकंदाच्या या व्हिडिओ हमासचे दशतवाद्यानी इस्रायलमधील संगीत कॉन्सर्टच्या ठिकाणी हातात बंदूक घेऊन वावरताना दिसत आहेत. संगीत कॉन्सर्टच्या ठिकाणी अनेक तरुण तरुणी मृत्युमुखी पडल्याचे दिसत आहेत.
काही ठिकाणी मृतदेहांचे खच पडले आहेत. इस्रायलने 07 ऑक्टोबर 2023 रोजी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली, त्यावेळचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे.
या सुपरनोव्हा ट्रान्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये किमान 260 लोकांची हत्या करण्यात आली आणि अनेकांचे अपहरण करण्यात आले, असे इस्रायली अधिकार्यांनी म्हटले आहे.
संगीत कॉन्सर्टमध्ये एकत्र आलेल्या सुमारे 3,500 तरुण इस्त्रायलींना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत गोळीबार केला. यात काहीजण मद्य किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली होते, ज्यामुळे अधिक गोंधळ आणि भीती निर्माण झाली.
दरम्यान, इस्रायल-हमास युद्धाला चौथा आठवडा पूर्ण झाला आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीत आतापर्यंत हजारो पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतून हमासचा खात्मा करण्यासाठी लष्कर सातत्याने बॉम्ब वर्षाव करत आहे. जवळपास महिनाभर सुरू असलेले हे युद्ध अद्याप संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. युद्धबंदीबाबतही चर्चा होताना दिसत नाही.
या युद्धात इस्रायलमध्ये 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 200 लोकांचे अपहरणही झाले आहे. इस्रायली लष्कराच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे गाझामध्ये मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या 9200 हून अधिक झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.