Hafiz Saeed Dainik Gomantak
ग्लोबल

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

Hafiz Saeed Close Aide Shot Dead Karachi: पाकिस्तानमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांवर 'अज्ञात बंदुकधाऱ्यांकडून' होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये.

Manish Jadhav

Hafiz Saeed Close Aide Shot Dead Karachi: पाकिस्तानमध्ये भारतविरोधी दहशतवाद्यांवर 'अज्ञात बंदुकधाऱ्यांकडून' होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. जमात-उद-दावा आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या अत्यंत जवळच्या आणि निष्ठावंत दहशतवाद्याची कराचीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हा दहशतवादी आपल्या घराच्या दाराजवळ बसला असताना, दोन दुचाकींवरुन आलेल्या चार अज्ञात बंदुकधाऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंध गोळीबार केला.

हा हल्ला इतका अचानक आणि तीव्र होता की, त्या दहशतवाद्याला बचावासाठी हॅंडल किंवा हालचाल करण्याची साधी संधीही मिळाली नाही. त्याला जागीच ठार केल्यानंतर हल्लेखोर त्याचा वैयक्तिक शस्त्रसाठा आणि हत्यारही सोबत घेऊन पसार झाले.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट पसरली असून, पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. मृत दहशतवाद्याची लढाऊ ओळख आणि लष्कर-ए-तैयबातील त्याची भूमिका गुप्त ठेवण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, कराचीतील हा हल्ला पाकिस्तानात गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद्यांना (Terrorist) लक्ष्य करुन केल्या जाणाऱ्या मालिकांमधीलच एक भाग मानला जात आहे. या हत्येमागे आंतरराष्ट्रीय टोळीयुद्ध आहे की अन्य कोणती यंत्रणा, याचा शोध घेतला जात आहे.

पाकिस्तानमध्ये 2020 पासून भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा अशाच प्रकारे अज्ञात हल्लेखोरांकडून खात्मा केला जात आहे. एप्रिल 2024च्या तपासात अशा सुमारे 20 हून अधिक प्रकरणांचा खुलासा झाला होता, ज्यामध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित प्रमुख म्होरके मारले गेले होते. अब्दुल रहमान मक्की, फैसल नदीम, सलमान आणि नुकताच खैबर पख्तुनख्वा येथे मारला गेलेला शेख युसूफ आफ्रिदी यांसारख्या खतरनाक दहशतवाद्यांची अशाच पद्धतीने हत्या झाली.

पाकिस्तान सरकार सातत्याने या हल्ल्यांमागे परकीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा कांगावा करत असले, तरी भारताने हे सर्व फेटाळून लावले आहे. पाकिस्तानातील सुरक्षित आश्रयाला राहिलेल्या दहशतवाद्यांना आता स्वतःच्याच भूमीत मृत्यूची भीती भेडसावत आहे. कराचीतील या ताज्या घटनेमुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये प्रचंड दहशतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT