Indian Football League: धेंपो क्लबला काश्मीरमध्ये 3-1 ने धक्का; रियल काश्मीरने उघडले विजयाचे खाते

Dempo Sports Club vs Real Kashmir: प्रकाशझोतात झालेल्या या लढतीत रियल काश्मीरने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
Dempo Sports Club vs Real Kashmir
Indian Football LeagueDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: श्रीनगरमधील रात्रीच्या थंडीत गोव्यातील धेंपो स्पोर्टस क्लब सोमवारी ‘गारठला’, परिणामी त्यांना इंडियन फुटबॉल लीग (आयएफएल) स्पर्धेत स्थानिक रियल काश्मीर संघाकडून ३-१ फरकाने पराभव पत्करावा लागला.

प्रकाशझोतात झालेल्या या लढतीत रियल काश्मीरने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांच्यासाठी रोहेन सिंग याने १९व्या, ॲलेन इयेन्गा याने ३३व्या, तर मार्कुस जोसेफ याने ८७व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. धेंपो क्लबची पिछाडी ३५व्या मिनिटास रॉलिन बोर्जिस याने कमी केली होती. धेंपो क्लबची वारंवारची आक्रमणे यशस्वीपणे रोखलेला रियल काश्मीरचा गोलरक्षक सुस्नता मलिक सामन्याचा मानकरी ठरला.

Dempo Sports Club vs Real Kashmir
Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखालील धेंपो क्लबचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. अन्य तीन विजयामुळे त्यांचे नऊ गुण व सध्या दुसरा क्रमांक कायम राहिला आहे. अगोदरच्या दोन बरोबरी व पराभवानंतर इश्फाक अहमद यांच्या मार्गदर्शनाखालील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता चार सामन्यांतून पाच गुण झाले असून ते सातव्या क्रमांकावर आले आहेत.

पुढील सामना नागालँडमध्ये

धेंपो क्लबचा स्पर्धेतील पुढील सामना ३० नोव्हेंबर रोजी नागालँड युनायटेडविरुद्ध नागालँडमधील चुमूकेडिमा येथे खेळला जाईल.

Dempo Sports Club vs Real Kashmir
Goa Politics: 'मी योग्य तेच केले, निर्णय मतदार घेतील'; मनोज परब यांच्या आरोपांवर बोरकरांचा पलटवार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.