Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Pakistan Khyber Pakhtunkhwa Suicide Attack: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू आणि टँक जिल्ह्यांच्या सीमेवर एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला.
Pakistan Khyber Pakhtunkhwa Suicide Attack
Pakistan Suicide AttackDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Khyber Pakhtunkhwa Suicide Attack: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू आणि टँक जिल्ह्यांच्या सीमेवर एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेली एक गाडी सुरक्षा दलांच्या चेक पोस्ट बाहेरील भिंतीला जोरदार धडकवली. या महाभयंकर स्फोटात 12 सैनिकांसह 15 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, यामध्ये 12 लष्करी जवान, 2 पोलीस कर्मचारी आणि वनविभागाच्या एका माजी सरकारी अधिकाऱ्याचा समावेश आहे. स्फोट इतका भयानक होता की, संपूर्ण चेक पोस्टची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

पाकिस्तान सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला शुक्रवारी संध्याकाळी घडला. गाडी धडकल्यानंतर झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरक्षा दलांनी तातडीने सावध होत प्रत्युत्तराखल जोरदार गोळीबार केला. सैन्याने केलेल्या या कारवाईत 12 दहशतवाद्यांना जागीच कंठस्नान घालण्यात यश आले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने थेट घेतलेली नसली, तरी या भागात 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) ही बंदी घातलेली दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांत खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागात टीटीपीच्या हिंसक कारवाया आणि हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

Pakistan Khyber Pakhtunkhwa Suicide Attack
Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

या भीषण घटनेनंतर पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमधील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली. पाकिस्तानने यापूर्वीही आपल्या सीमावर्ती भागात होणाऱ्या अशा भीषण दहशतवादी हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीवरुन चालणाऱ्या दहशतवादाला जबाबदार धरले. मात्र, तालिबान सरकारने हे सर्व आरोप सतत फेटाळून लावले आहेत. दोन्ही देशांमधील या वादांमुळे आधीच अनेकदा सशस्त्र चकमकी आणि हवाई हल्ले झाले आहेत. जून महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले होते, असा दावा संयुक्त राष्ट्र आणि तालिबानने केला होता. या ताज्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com