Google New Rules Dainik Gomantak
ग्लोबल

Google New Rules: 18 वर्षांखालील मुलांसाठी इंटरनेट वापरण्याचे नवे नियम

18 वर्षांखालील मुलांसाठी सर्व प्रकारच्या जाहिराती पाहण्यावर गुगलकडून बंदी असेल, त्यानुसार आता जाहिराती वेगवेगळ्या वयोगटांसाठी सेपरेट केल्या जाणार आहेत.

दैनिक गोमन्तक

ऑनलाइन सुरक्षितता (Online Security) वाढवण्यासाठी Google ने आपले सुरक्षा नियम बदलले आहेत. त्यामुळे आता 18 वर्षांखालील मुलांसाठी गुगल सर्च आणि यूट्यूब वापरण्यासाठीचे नियम अधिक कडक झाले आहेत. या नियमांमुळे मुलांच्या Google आणि YouTube च्या वापरावर अंशतः बंदी घातली जाणार, याचा अर्थ 18 वर्षाखालील मुले Google आणि YouTube च्या सर्व वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकणार नाहीत. यासह, मुलांच्या इंटरनेट सुरक्षिततेसाठी काही नवीन वैशिष्ट्ये आणली गेली आहेत.

बदल काय आहेत

  • 18 वर्षांखालील मुलांसाठी सर्व प्रकारच्या जाहिराती पाहण्यावर गुगलकडून बंदी असेल, त्यानुसार आता जाहिराती वेगवेगळ्या वयोगटांसाठी सेपरेट केल्या जाणार आहेत.

  • 18 वर्षाखालील लोक Google खाते तयार करू शकणार नाहीत. परंतु त्यांना मर्यादित फिचर्ससह Google खाते वापरण्याची परवानगी असणार आहे.

  • Google हळू हळू आपल्या डीफॉल्ट अपलोड सेटिंग बदलणार देखील बदलणार आहे. 13 ते 17 वयोगटातील मुले YouTube डीफॉल्ट अपलोड वापरू शकणार नाहीत. तसेच, सर्च फिल्टर करण्याची सुविधा असेल. म्हणजे तुम्ही निवडलेला विषय तुमच्या Google Search लीस्टमध्ये दिसणार आहे.

  • गुगल लवकरच 18 वर्षांखालील मुलांसाठी एक नवीन फिचर आणणार आहे, जे सुरक्षितेसाठीच ओळखले जाईल. यामध्ये मुलांचे गुगल खाते थेट त्यांच्या कुटुंबीयांशी जोडले जाणार आहे. ज्यामध्ये 18 वर्षांची मुले साइन इन करू शकतील. त्यामुळे आपली मुलं ऑनलाईन काय शोधता आहेत, हे कुटुंबातील सदस्यांना कळेल.

  • गुगलने गुगल प्ले स्टोअरवर नवीन सुरक्षा विभाग सुरू केला आहे. जिथून पालक त्यांचे मूलं कोणते अॅप डाउनलोड करता आहे हे सुद्धा जाणुन घेऊ शकणार आहेत. तसेच, किती डेटा वापरला हे जाणुन घेण्याची देखील सुविधा असणार आहे.

ऑनलाइन सुरक्षितता वाढणार

गुगलचे किड्स अँड फॅमिली विभाग व्यवस्थापक मिंडी ब्रूक्स म्हणाले की, आमची उत्पादने कार्यक्षम आणि सोयीस्कर बनवण्यासाठी डेटा महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे मुलांना कोणता डेटा वापरण्यास सुरक्षित आहे हे समजण्यास मदत करणे हे आमचे काम आहे. आणि ते कसे वापरले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT