France Omicron Update

 

Dainik Gomantak

ग्लोबल

France Omicron Update: ओमिक्रॉनमुळे फ्रान्सने लावले 'हे' निर्बंध

ओमिक्रॉनमुळे आता सर्वच सरकार खबरदरीची पावले उचलत आहे. यातच आता फ्रान्सने काही कोविड संदर्भात काही कठोर निर्बंध जाहीर केले आहेत.

दैनिक गोमन्तक

France Omicron Update: कोरोनाचे संकट कमी होतंय ना होतंय तोपर्यंत ओमिक्रॉनसारखा नवा कोरोनाचा नवा प्रकार आता पुन्हा जगासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे सगळीकडे मागील दोन वर्षांसारखे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओमिक्रॉनमुळे आता सर्वच सरकार खबरदरीची पावले उचलत आहे. यातच आता फ्रान्सने काही कोविड संदर्भात काही कठोर निर्बंध जाहीर केले आहेत.

फ्रान्समध्ये (France) 3 जानेवारीपासून वर्क फ्रॉम होम (Work From Home) अनिवार्य होणार आहे. जे रिमोट वर्क करू शकतात त्यांना ते लागू होईल. त्याचबरोबर कार्यक्रमांसाठी, सार्वजनिक मेळाव्यांसाठी जास्तीतजास्त 2,000 लोकांपर्यंत मर्यादा असणार आहे. याची पार्श्वभूमी अशी की, फ्रान्समध्ये शनिवारी 100,000 हून अधिक नवीन संक्रमणांची नोंद झाली. ही संख्या साथीचा रोग सुरू झाल्यापासून देशातील सर्वाधिक संक्रमणांची संख्या आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या असतानाही फ्रान्स सरकारने नववर्षाच्या पूर्वसंध्येला कर्फ्यू न लावण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी जीन कास्टेक्स यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की साथीचा रोग "कधीही न संपणाऱ्या चित्रपटासारखा" होता. या बैठकीनंतर त्यांनी नवीन सुरक्षा उपायांची माहिती दिली. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिव्हियर व्हेरन म्हणाले की, कोरोनाव्हायरस संक्रमण दर दोन दिवसांनी दुप्पट होत आहे, देशात कोरोनाची “मेगा लाट” येण्याचा इशारा आहे.

असे असतील नियम:

  • सार्वजनिक मेळाव्यावर मर्यादा

  • लांब पल्ल्याच्या वाहतुकीदरम्यान खाण्या-पिण्याच्या सोयींवर निर्बंध

  • पुढील आदेशापर्यंत नाइटक्लब बंद

  • कॅफे आणि बारमध्ये फक्त टेबल सेवा

  • घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस घरून काम करावे लागेल.

  • शहरात फिरताना मास्क घालणे बंधनकारक असेल.

सरकारने शेवटच्या लसीनंतर बूस्टर घेण्याचा कालावधी चार महिन्यांपर्यंत कमी केला असून आता तीन महिन्यांनंतरच बूस्टर दिले जातील. फ्रान्स सरकारने रुग्णसंख्या वाढू नये म्हणून त्वरित सर्व खबरदारी घेतली आहे. आता आपल्या देशात सरकार काय निर्णय घेणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT