जसजश्या निवडणुका, जवळ येतात तसतसे बॅनर बाजीला (Banner) उधान येते, शासकीय मालमत्ता आणि सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय लावण्यात आलेले होर्डिंग, बॅनर, झेंडे, पोस्टर्स तात्काळ हटविण्याचे निर्देश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत.
आप आणि तृणमूलने जागोजागी पोस्टर लावले आहेत, वारेमाप पैसा बॅनरसाठी खर्च केला आहे, शहराती, गावातील, गल्ली बोळातील एकही जागा सोडलेली नाही की जिथे पोस्टर नाही. गोव्यात सत्ताधारी भाजपला आप तृणमूलने तगडं आव्हान दिले, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहेत. भाजप आपला प्रचार करण्यासाठी सगळी जागा वापरते पण यावेळी भाजपला पोस्टर लावायला जागाच शिल्लक नाही अशी परिस्थिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी आम आदमी पार्टी (AAP) आणि तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress) पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात “बॅनर प्रदूषण” पसरवल्याचा आरोप केला. सावंत म्हणाले की, पर्यटनाच्या दृष्टीने भारी असलेल्या राज्यातील मालमत्ता आणि सार्वजनिक क्षेत्रांची बदनामी करणाऱ्या अशा बॅनरसाठी या पक्षांवर कठोर कारवाई करण्यास त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
"या निवडणुकीत गोव्यातील (Goa) एक महत्त्वाचा फरक म्हणजे अरविंदकेजरीवाल (CM Arvind Kejriwal) आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकीय पक्षांनी सुरू केलेले बॅनर प्रदूषण. सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेवर स्टिकर्स चिकटवणे म्हणजे अधिकाऱ्यांची तसेच गोव्याच्या सौंदर्याची उघड अवहेलना आहे," असे सावंत यांनी ट्विट करत त्यांच्यावरती टीका केली आहे. एकंदरीतच राज्यातील सर्वच भागात 'बॅनर युद्ध' दिसून आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.