France Protest Dainik Gomantak
ग्लोबल

France Violence: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

France Violent Protests Video: नेपाळमधील राजकीय अस्थिरतेनंतर आता युरोपमधील शक्तिशाली देश फ्रान्सच्या रस्त्यांवरही अभूतपूर्व हिंसाचार आणि विरोध प्रदर्शन सुरु झाले आहे.

Manish Jadhav

France Violent Protests Video: नेपाळमधील राजकीय अस्थिरतेनंतर आता युरोपमधील शक्तिशाली देश फ्रान्सच्या रस्त्यांवरही अभूतपूर्व हिंसाचार आणि विरोध प्रदर्शन सुरु झाले आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात शेकडो लोकांचे जमाव रस्त्यावर उतरले असून, त्यांनी जाळपोळ, तोडफोड आणि हिंसक आंदोलन सुरु केले आहे. मॅक्रॉन यांनी देशासाठी नवीन पंतप्रधानांची घोषणा करताच हा मोठा हिंसाचार उसळला, ज्यामुळे संपूर्ण फ्रान्समध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या आंदोलनाचे स्वरुप एवढे भयावह आहे की, देशभरात नियोजित विरोध प्रदर्शनांच्या पहिल्या काही तासांमध्येच सुमारे 200 आंदोलकांना अटक करण्यात आली. बुधवारी (10 सप्टेंबर) पॅरिससह फ्रान्सच्या (France) इतर भागांमधील आंदोलकांनी मंत्र्यांना अडवून ठेवले, तर अनेक ठिकाणी जोरदार जाळपोळही करण्यात आली. दुसरीकडे, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. आंदोलक राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरुन त्यांनी नियुक्त केलेल्या नवीन पंतप्रधानांना पायउतार करण्यात यावे.

80,000 पोलीस दलाची तैनाती, तरीही गोंधळ सुरु

या आंदोलनाची गंभीरता लक्षात घेता फ्रान्सच्या रस्त्यांवर किमान 80,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात असूनही आंदोलनातील गोंधळ अजूनही थांबलेला नाही. 'सब कुछ बंद करो' किंवा 'ब्लॉक एव्हरीथिंग' (Block Everything) या ऑनलाइन मोहिमेअंतर्गत हे आंदोलन सुरु झाले आणि ते संपूर्ण देशात वेगाने पसरले. या आंदोलनाने 80,000 पोलिसांच्या (Police) अभूतपूर्व तैनातीलाही आव्हान दिले आहे. संतप्त जमावाने अनेक ठिकाणी बॅरिकेड्स हटवले, त्यानंतर पोलिसांनी तातडीने अटकसत्र सुरु केले.

फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रेटैलो यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, पश्चिम शहरांमध्ये रेन (Rennes) येथे एका बसला आग लावण्यात आली, तर दक्षिण-पश्चिमेकडील भागात वीज वाहून नेणाऱ्या तारांनाही नुकसान पोहोचवले गेले, ज्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली. आंदोलक 'बंडाचे वातावरण' (Atmosphere Of Rebellion) निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पॅरिसमध्येही जोरदार जाळपोळ

बुधवारी सकाळी पॅरिसमध्येही आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाला. यावेळी अनेक कचरापेट्या जाळण्यात आल्या. आंदोलक राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कठोर आर्थिक धोरणांवर नाराज आहेत. त्यांनी देशभरातील सर्व व्यवहार ठप्प करण्याची योजना आखली होती. पॅरिस पोलीस प्रीफेक्चरने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजेपर्यंत 75 लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि दिवसभर हे प्रदर्शन आणि रस्ते अडवण्याचे प्रकार सुरुच राहण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांना हटवल्यानंतर भडकले आंदोलन

फ्रान्समध्ये हे मोठे आंदोलन तत्कालीन पंतप्रधान फ्रान्सुआ बेयरु यांना संसदेत विश्वासमत हरल्यामुळे पदावरुन हटवण्यात आल्यानंतर सुरु झाले. त्यांच्या जागी मंगळवारी सेबास्टियन लेकोर्नू यांना नवीन पंतप्रधान बनवण्यात आले. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनानंतर हजारो आंदोलक देशभरात रस्त्यावर उतरले.

'ब्लॉको तू' (Blocon Tou) नावाने ओळखले जाणारे हे आंदोलन उन्हाळ्याच्या सुरुवातीला सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड चॅट्समध्ये कोणत्याही स्पष्ट नेतृत्वाशिवाय व्हायरल झाले होते. या आंदोलकांच्या मागण्यांची यादी खूप मोठी आहे. त्यातील अनेक मागण्या तत्कालीन पंतप्रधान बेयरू यांनी सादर केलेल्या कठोर अर्थसंकल्पीय प्रस्तावांच्या विरोधात आहेत, तसेच देशातील वाढत्या आर्थिक असमानतेवरही लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. बुधवारी झालेल्या आंदोलनात संप, बहिष्कार, रस्ते अडवणे आणि इतर विरोध प्रदर्शनांसाठी ऑनलाइन आवाहन करण्यात आले होते, ज्यात हिंसेपासून दूर राहण्याचे आवाहनही होते.

2018 च्या 'येलो वेस्ट' आंदोलनाची आठवण

'ब्लॉक एव्हरीथिंग' (Block Everything) आंदोलनाची ही अचानक आणि व्यापक प्रतिक्रिया 2018 मध्ये झालेल्या 'येलो वेस्ट' (Yellow Vest) आंदोलनाची आठवण करुन देते. त्यावेळी इंधनावरील करात वाढ केल्याच्या निषेधार्थ कामगार रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. तो आंदोलन लवकरच राजकीय, सामाजिक, प्रादेशिक आणि पिढीगत मतभेद ओलांडून आर्थिक अन्यायाविरुद्ध आणि मॅक्रॉनच्या नेतृत्वाविरुद्ध राष्ट्रीय संतापाचे रुप धारण केले होते. यातून हे स्पष्ट होते की, फ्रान्समध्ये जनतेमध्ये आर्थिक धोरणांवरून मोठा असंतोष आहे, आणि तो आता पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT