PM Modi in France: 'तुम्ही 20 तास काम कसे करता...', एनआरआयने पंतप्रधान मोदींना विचारले

PM Modi France Visit: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रॅंड वेलकम करण्यात आले.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

PM Modi France Visit: फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रॅंड वेलकम करण्यात आले. त्यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान अनिवासी भारतीयांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.

फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न पॅरिस विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचल्या. यानंतर पंतप्रधान थेट हॉटेल प्लाझा अथनी येथे गेले, जिथे शेकडो अनिवासी भारतीय त्यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते.

त्यापैकी एका एनआरआयने पंतप्रधानांना विचारले की, तुम्ही दिवसाचे 20 तास काम कसे करता...' त्यानंतर ते फक्त हसले.

दरम्यान, पंतप्रधानांचे गुरुवारी फ्रान्समध्ये आगमन झाले असून ते आज रात्री 11 वाजता ला सीन म्युझिकेल येथे भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होणार आहेत. त्यानंतर, फ्रेंच नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष येएल ब्राउन-पिव्हेट यांना भेटतील.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदींचा फ्रान्सचा दौरा दोन दिवसांचा असून ते पॅरिसमध्ये (Paris) आयोजित करण्यात आलेल्या फ्रेंच राष्ट्रीय दिनाच्या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा दिवस बॅस्टिल डे म्हणूनही ओळखला जातो.

भव्य बॅस्टिल डे परेडमध्ये भारतीय तिरंगी सेवा दलाचा सहभाग हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असेल. या दरम्यान, भारतीय हवाई दल एक प्रभावी फ्लाय-पास्ट सादर करेल, जे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल.

PM Modi
PM Modi France Visit: फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रॅंड वेलकम, लोकांनी दिल्या 'भारत माता की जय' च्या घोषणा; पाहा VIDEO

भारत आणि फ्रान्सच्या धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत

हे वर्ष भारत आणि फ्रान्ससाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे, कारण दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. भारत आणि फ्रान्सने (France) विविध क्षेत्रांमध्ये व्यापक सहकार्याला महत्त्व दिले आहे.

या क्षेत्रांमध्ये संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक, ब्लू इकॉनॉमी, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, संस्कृती आणि पीपल टू पीपल संबंधांना प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे. हे वर्ष दोन्ही देशांमधील चिरस्थायी मजबूत संबंध आणि समृद्ध भविष्य अधोरेखित करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Best Places to Visit in Sindhudurg
Viral Post
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com