France Unrest: फ्रान्स जळतोय, राष्ट्रपती पार्टीत मग्न... फ्रेंच नागरिकांनी व्यक्त केला संताप; Video

France Portest: फ्रान्समध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक शहरे पेटली आहेत.
France Unres
France UnresDainik Gomantak
Published on
Updated on

France Portest: फ्रान्समध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर अनेक शहरे पेटली आहेत. आंदोलक डझनहून अधिक शहरांमध्ये हिंसकपणे निदर्शने करत आहेत. सरकारी मालमत्ता ताब्यात घेत आहेत. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जाळण्यात आली असून बस, सरकारी कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी दगडफेक करण्यात येत आहे.

दरम्यान, फ्रान्समध्ये उसळलेली हिंसाचाराची आग इतर युरोपीय देशांमध्येही पसरु लागली असून बेल्जियममध्येही हिंसाचार सुरु झाला आहे.

दुसरीकडे, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका नाईट क्लबमध्ये डान्स करताना दिसत आहेत.

France Unres
France: पत्नीला अंमली पदार्थ देऊन बलात्कार करण्यासाठी बोलवले परपुरुष, 51 व्हिडिओ केले रेकॉर्ड

दंगलीच्या आगीत फ्रान्स जळतोय

फ्रान्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी हिंसाचाराची आग भडकत आहे. देशभरात सुमारे 400 लोकांना अटक करण्यात आली आहे, तर 170 पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु जखमी नागरिकांची आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डार्मिनिन यांनी गुरुवारी उत्तरेकडील मॉन्स-एन-बरौल शहरातून बोलताना सांगितले की, “सरकारचा प्रतिसाद अत्यंत कठोर असला पाहिजे.” ते पुढे म्हणाले की, नगरपालिकेच्या अनेक इमारतींना आग लावण्यात आली आहे.

डार्मिनिन पुढे म्हणाले की, 'हिंसक आंदोलकांनी आंदोलन थांबवावे.' मात्र, सध्या देशात आणीबाणी लागू करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 2005 मध्ये फ्रान्समध्ये अशाच प्रकारे दंगल उसळली होती, त्यानंतर देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती.

France Unres
France Gas Explosion Video: पॅरिसमध्ये गॅसचा भीषण स्फोट; इमारती उद्धवस्त, अनेकजण जखमी

दुसरीकडे, 17 वर्षांच्या नाहेल एम या तरुणाची फ्रेंच ट्रॅफिक पोलिसाने गोळी झाडून हत्या केली होती. घटनास्थळावरुन समोर आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये दिसत आहे की, ट्रॅफिक पोलिस त्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न करतो, त्यानंतर वाहतूक पोलिस गोळीबार करतात.

ट्रॅफिक पोलिसांची गोळी लागल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्याची फ्रान्समधील या वर्षातील ही तिसरी घटना आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिले की, 2017 नंतर, फ्रेंच ट्रॅफिक पोलिसांनी गोळ्या झाडलेले बहुतेक बळी हे कृष्णवर्णीय किंवा मध्य पूर्व वंशाचे होते.

मंगळवारी गोळी झाडण्यात आली

वृत्तानुसार, 17 वर्षीय मुलाने मंगळवारी सकाळी ट्रॅफिकमध्ये आपली मर्सिडीज-एएमजी कार बस लेनमध्ये आणली होती, त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्याला बस लेनमधून बाहेर जाण्यास सांगितले. पण, बस लेनमधून गाडी बाहेर काढण्याऐवजी त्याने गाडी पुढे पळवू लागला.

France Unres
France-अमेरिकेनंतर आता जपाननेही महिलांसाठी केली मोठी घोषणा, गर्भपाताच्या गोळ्यांना दिली मंजूरी!

त्याचवेळी, दोन वाहतूक अधिकारी वाहतूक हाताळत होते आणि जेव्हा कार धावू लागली तेव्हा एका अधिकाऱ्याने ड्रायव्हरच्या खिडकीजवळून गोळी झाडली. नॅनटेरेचे सरकारी वकील पास्कल प्राचे यांनी सांगितले की, नाहेलच्या डाव्या हाताला आणि छातीत गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

दुसरीकडे, ज्या पोलिस अधिकाऱ्याने नाहेलला मारले त्याने गोळी झाडल्याचे कबूल केले. पुढे तपासकर्त्यांना त्याने सांगितले की, व्यस्त रहदारीच्या मध्यभागी गाडीचा वेग वाढल्याने अपघात होऊन अनेक लोक जखमी होऊ शकतात, अशी भीती त्यांना वाटत होती.

France Unres
France New Pension Scheme : फ्रान्समध्ये नव्या पेन्शन योजनेविरोधात हिंसक आंदोलन, नेमकं काय आहे प्रकरण सविस्तर वाचा

राष्ट्रपतींची नाईट क्लबमध्ये पार्टी

राष्ट्रपतींनी या गोळीबाराचा निषेध केला असला तरी त्यांच्या नाईट क्लबमधील व्हिडिओने फ्रेंच लोक संतप्त झाले आहेत. लोकांचा आरोप आहे की, एकीकडे फ्रान्स जळत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रपती पार्टी करत आहेत.

त्याचवेळी, मयत मुस्लिम असल्याने दंगल उसळू दिली गेली. त्याचबरोबर, सरकार मताच्या राजकारणासाठी आंदोलकांवर कारवाई करत नसल्याचा आरोपही अनेकांनी केला.

अनेक फ्रेंच पत्रकारांनी इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांच्यावर व्होट बँकेमुळे फ्रान्स जळताना पाहत असल्याचा आरोप केला आहे.

अनेक बातम्यांमध्ये असाही आरोप करण्यात आला आहे की, फ्रान्समधील अनेक संधीसाधू नेते आणि सेलिब्रिटी मृतांच्या कुटुंबाच्या समर्थनार्थ येत आहेत. ते एक प्रकारे हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत.

France Unres
France Exit Poll: अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संसदेत गमावले बहुमत

तसेच, पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेला 17 वर्षीय किशोर हा वॉन्टेड गुन्हेगार असून त्याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. याआधीही त्याला पोलिसांनी 5 वेळा रोखले होते पण तो थांबला नव्हता, असे द रेअर फाऊंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गाडीचा वेग वाढवून पळून जाणे. याशिवाय, मृत व्यक्तीवर फ्रान्समध्ये (France) अंमली पदार्थांची तस्करी, खोट्या लायसन्स प्लेट्सच्या आधारे वाहन चालवल्याचा आरोप होता. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान फ्रेंच नार्कोटिक्स अधिकार्‍यांसोबत अनेक चकमकी झाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com