France Violence: फ्रान्समध्ये हिंसाचाराचा भडका! न्यू कॅलेडोनियात आणीबाणी लागू; 4 जणांचा मृत्यू, 5,000 दंगलखोरांवर कारवाई

France Violence: फ्रान्समध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. मागील काही महिन्यांपासून फ्रान्स हिंसाचारामुळे धगधगत आहे.
emergency in new caledonia
emergency in new caledoniaDainik Gomantak
Published on
Updated on

France Violence: फ्रान्समध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. मागील काही महिन्यांपासून फ्रान्स हिंसाचारामुळे धगधगत आहे. यातच, फ्रेंच सरकारने बुधवारी न्यू कॅलेडोनियामध्ये 12 दिवसांसाठी आणीबाणीची घोषणा केली.

त्यानंतर गुरुवारी सकाळी फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले की, न्यू कॅलेडोनियाच्या दोन विमानतळ आणि बंदराचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांनी तिसऱ्या रात्री हिंसक दंगलीनंतर दंगलखोरांचा सामना केला. त्यांच्या कारवाईत चार जण ठार झाले. फ्रेंच उच्चायुक्त लुई ले फ्रँक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, न्यू कॅलेडोनियामधील तीन नगरपालिकांमध्ये सुमारे 5,000 दंगलखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

ते म्हणाले की, ‘दोनशे लोकांना अटक करण्यात आली आहे. 64 पोलिस (Police) कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले आहेत. आंदोलकांनी रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेड्समुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.’

emergency in new caledonia
France: इंग्लिश चॅनल ओलांडताना एका मुलासह पाच जणांचा मृत्यू; समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह

तत्पूर्वी, फ्रान्स सरकारच्या प्रवक्त्या प्रिस्का थेव्हनॉट यांनी बुधवारी दुपारी पॅरिसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आणीबाणी लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारपासून 200 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली असून 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

emergency in new caledonia
PM Modi France Visit: फ्रान्सच्या एलिसी पॅलेसमध्ये अचानक वाजल 'हे' बॉलिवुडचे गाणं अन् पीएम मोदी पाहतचं राहिले, Watch Video

हिंसाचार का भडकला?

मतदार सूचीच्या विस्तार करण्याच्या प्रयत्नांविरोधात सोमवारी न्यू कॅलेडोनियामध्ये निदर्शने सुरु झाली. न्यू कॅलेडोनिया बेटांवर स्वातंत्र्य हवे असलेले कनाक आणि फ्रान्सचा भाग राहू इच्छिणारे लोक यांच्यात अनेक दशकांपासून तणाव आहे. दुसरीकडे, फ्रान्सच्या (France) गृहमंत्रालयाने मंगळवारी न्यू कॅलेडोनियाला मोठा पोलिसांचा फौजफाटा पाठवला. राजधानी नौमियामध्ये कर्फ्यू लागू असतानाही पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष सुरु झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com