France: इंग्लिश चॅनल ओलांडताना एका मुलासह पाच जणांचा मृत्यू; समुद्रकिनाऱ्यावर सापडले मृतदेह

France: उत्तर फ्रान्समधून धोकादायक इंग्लिश चॅनेल ओलांडण्याच्या प्रयत्नात एका मुलासह पाच स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे.
France
FranceDainik Gomantak

France: उत्तर फ्रान्समधून धोकादायक इंग्लिश चॅनेल ओलांडण्याच्या प्रयत्नात एका मुलासह पाच स्थलांतरितांचा मृत्यू झाला आहे. फ्रेंच मीडियाने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉईक्स डु नॉर्ड या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे की, उत्तर फ्रान्समधील विमेरॉक्स बीचवर मंगळवारी पाच स्थलांतरितांचे मृतदेह सापडले.

वृत्तपत्रानुसार, घटनास्थळी बचावकार्य सुरु असून त्यासाठी बोट आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. या अपघातात सुमारे 100 स्थलांतरितांची सुखरुप सुटका करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांना फ्रेंच नौदलाच्या जहाजातून बोलोन बंदरात नेण्यात येणार आहे. दरम्यान, ब्रिटीश संसदेने काही बेकायदेशीर स्थलांतरितांना रवांडा येथे हद्दपार करण्याच्या ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर काही तासातच ही घटना घडली. मानवाधिकार गटांनी या कायद्याचे अमानवी आणि क्रूर असे वर्णन केले आहे.

सुनक सरकारने या निर्णयाचा विचार करावा

दरम्यान, बेकायदेशीररित्या लहान बोटीतून देशात प्रवेश करणाऱ्या निर्वासितांना हद्दपार करण्याची ब्रिटिश सरकारची योजना आहे. हे स्थलांतरित आपला जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे ब्रिटनमध्ये येतात. मात्र, मानवाधिकार आयोगाने या कायद्याचे वर्णन अमानवी आणि क्रूर असे केले आहे. यूएन शरणार्थी एजन्सी आणि युरोप कौन्सिल या दोघांनी मंगळवारी सुनक सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले.

France
PM Modi France Visit: फ्रान्समध्ये घुमले 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा'; भारतीय त्रि-सेवा दलाचा पॅरिसमध्ये सराव

दुसरीकडे, स्थलांतरित लोक छोट्या बोटीतून इंग्रजी चॅनेल (ब्रिटन आणि उत्तर फ्रान्सला वेगळा करतो) ओलांडण्याच्या प्रयत्नात अनकेदा जीवावर बेतते. सुनक सरकारच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये अंदाजे 30,000 लोकांनी इंग्रजी चॅनेल ओलांडण्याचा प्रयत्न केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com