

Zodiac Personality Traits: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या राशीतील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतो. अनेकदा आपण पाहतो की, एखाद्या समूहात काही लोक सतत बडबड करुन लक्ष वेधून घेतात, तर काही जण कोपऱ्यात शांत बसून केवळ ऐकण्याचे काम करतात. मात्र, या शांत बसणाऱ्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
ज्योतिष शास्त्रात या व्यक्तींची अतिशय अचूक व्याख्या करण्यात आली असून त्यांना 'सायलेंट ऑब्झर्व्हर' असे म्हटले जाते. हे लोक कमी बोलतात, पण त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक लहान-मोठ्या हालचालीवर त्यांची करडी नजर असते. समोरच्या व्यक्तीच्या सवयी, त्याचे हावभाव आणि इरादे ते केवळ निरीक्षणातूनच ओळखतात. अशा कोणत्या राशी आहेत, ज्या आपल्या शांततेचा वापर करुन इतरांच्या मनातील गुपिते उघड करतात, याचा आढावा घेणे रंजक ठरेल.
या यादीत 'कन्या' राशीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या राशीचे लोक बारीकसारीक गोष्टींचे पारखी असतात. त्यांची दृष्टी अतिशय सूक्ष्म असते. समोरच्या व्यक्तीच्या आवाजातील चढ-उ उतार असो किंवा त्याच्या वागण्यातील अचानक झालेला बदल, कन्या राशीच्या व्यक्ती हे सर्व तत्काळ टिपतात. ते स्वतः शांत राहून संपूर्ण परिस्थितीचे सखोल विश्लेषण करतात आणि मनातल्या मनात समोरच्या व्यक्तीचे पूर्ण चित्र तयार करतात.
त्यांच्याकडून कोणतीही चूक लपवणे कठीण असते. दुसरीकडे, 'मीन' राशीचे लोक अत्यंत संवेदनशील मानले जातात. ते शब्दांपेक्षा समोरच्या व्यक्तीच्या भावना जास्त वाचतात. एखादी व्यक्ती मनातून अस्वस्थ असेल, तर मीन राशीचे लोक ते चटकन ओळखतात. त्यांची शांतता ही प्रत्यक्षात आसपासच्या लोकांची ऊर्जा समजून घेण्याची एक पद्धत असते.
'कुंभ' राशीचा विचार केला तर हे लोक गर्दीत राहूनही स्वतःचे वेगळेपण टिकवून ठेवतात. ते एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहतात. प्रत्येक वागण्यामागे काहीतरी ठोस कारण असते, हे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच ते आधी सर्व ऐकून घेतात आणि नंतरच आपले मत मांडतात. 'वृश्चिक' रास ही राशीचक्रातील सर्वात रहस्यमयी रास मानली जाते. हे लोक खूप कमी बोलतात, पण त्यांचे निरीक्षण अगाध असते. समोरच्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि त्याची 'बॉडी लँग्वेज' बघून ते व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, याचा छडा लावतात. त्यांची तीक्ष्ण नजर कोणालाही गोंधळात टाकू शकते.
'कर्क' राशीच्या व्यक्ती आपल्या आसपासच्या वातावरणाबाबत अत्यंत सजग असतात. कोण विश्वासार्ह आहे आणि कोण नाही, हे ठरवण्यासाठी ते लोकांच्या बोलण्याकडे बारकाईने लक्ष देतात. त्यांची स्मरणशक्तीही अफाट असल्याने ते जुन्या गोष्टींच्या आधारे सध्याच्या परिस्थितीचा अंदाज लावतात. याउलट, 'मकर' राशीचे लोक गंभीर आणि व्यावहारिक स्वभावाचे असतात. ते निरर्थक चर्चेत वेळ वाया घालवत नाहीत.
कोणत्याही नवीन ठिकाणी गेल्यावर ते आधी तिथल्या वातावरणाचा अंदाज घेतात आणि मगच ठरवतात की कोणाशी किती बोलायचे. त्यांची ही खामोशीच त्यांची सर्वात मोठी ताकद बनते. ज्योतिष शास्त्रानुसार, असे 'सायलेंट ऑब्झर्व्हर' लोक घाईघाईत प्रतिक्रिया देत नाहीत, तर पूर्ण माहिती गोळा करून योग्य वेळी अचूक निर्णय घेतात. म्हणूनच त्यांना उत्तम सल्लागार आणि कुशल रणनीतीकार मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.