Donald Trump Oath Ceremony Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump Oath Ceremony: डोनाल्ड ट्रम्प झाले अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष; शपथविधी सोहळ्याला जगभरातील दिग्गजांची हजेरी!

Donald Trump 47th America President: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्यासोबत जेडी व्हान्स यांनीही उपाध्यक्षपदाची शपथ घेतली.

Manish Jadhav

Donald Trump 47th America President: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्यासोबत जेडी व्हान्स यांनीही उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील आणि जगातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते.

शपथविधी सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

दरम्यान, ट्रम्प यांच्या शपथविधीला भारतीय उद्योग समूहातील आघाडीचे उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी निता अंबानी उपस्थिती लावली. याशिवाय, ट्रम्प यांचे दोस्त आणि प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क, मार्क झुकेरबर्ग, जेफ बेजोस, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई, टीम कूक आदींनी हजेरी लावली. तर राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते माजी राष्ट्रपती बराक ओबामा, जॉर्ज बूश, बुल क्लिंटन, यांच्यासह जॉर्ज मेलोनी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनीही सोहळ्याला हजेरी लावली.

अमेरिकेला महान बनवणार

रविवारी (19 जानेवारी) आयोजित करण्यात आलेल्या विजयी रॅलीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. अमेरिकेला महान बनवण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी पुन्हा एकदा सांगितले होते. ट्रम्प म्हणाले होते की, "आपण आपला देश पूर्वीपेक्षाही महान बनवणार आहोत. आपण आपल्या देशाचं वैभव पुन्हा मिळवणार आहोत. अमेरिकन शक्ती, समृद्धी, प्रतिष्ठा आणि अभिमानाचा एक नवीन अध्याय आपल्याला सुरु करायचा आहे."

ट्रम्प यांनी हार मानली नाही!

दरम्यान, चार वर्षांपूर्वी निवडणुकीत ट्रम्प यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. तथापि, ट्रम्प यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या हिमतीने सत्ता मिळवून दाखवली. त्यांनी त्यांच्या समर्थकांना यूएस कॅपिटलकडे मार्च करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे दंगल झाली आणि देशातील शांततापूर्ण सत्ता हस्तांतरणाची परंपरा खंडित झाली होती. परंतु ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षावरील आपली पकड कधीही गमावली नाही. महागाई आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे मतदारांमध्ये असलेल्या निराशेचा फायदा घेत त्यांनी निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ritika Sajdeh: रितिका सजदेहची लक्झरी चॉईस! मुंबईत खरेदी केलं नवीन आलिशान घर; किंमत तब्बल 'इतके' कोटी

Mardol: सफर गोव्याची! तळीजवळ गेल्यावर स्वच्छ, थंड हवा फुफुस्सांत पसरते; निसर्गसंपन्न 'म्हार्दोळ'

Madhav Gadgil: पर्यावरणाचा प्रखर प्रहरी, पश्चिम घाटांचे शिल्पकार डॉ. माधव गाडगीळ काळाच्या पडद्याआड

Vijay Hazare Trophy: गोव्याची झुंज अपयशी! 'विजय हजारे ट्रॉफी'त महाराष्ट्राचा 5 धावांनी विजय, ऋतुराजची शतकी खेळी पडली 'महागात'

eSakal Comscore: मराठी मीडियात 'ई-सकाळ'चा डंका! 19.5 मिलियन युजर्ससह ठरली देशातील नंबर वन वेबसाइट

SCROLL FOR NEXT