Manish Jadhav
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतात. सध्या ते न्यूयॉर्क न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे चर्चेत आले आहेत.
हश मनी प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क न्यायालयाने दोषी ठरवले आहे. हा गुन्हा कागदपत्रांच्या हेराफेरीच्या संबंधित आहे.
ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीत पॉर्न स्टार्सला त्यांच्या विरोधात बोलू नये म्हणून पैसे देऊन गप्प केले होते.
दोन दिवसांच्या सुनावणीनंतर 12 सदस्यांच्या ज्युरीने ट्रम्प यांच्याविरोधातील निकाल दिला. या निकालात ट्रम्प यांना सर्व 34 गुन्हेगारी प्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासात गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.
ट्रम्प यांना कोणती शिक्षा द्यायची याबाबत 11 जुलै रोजी निर्णय होणार आहे. व्यवसायाशी संबंधित कागदपत्रांची हेराफेरी केल्याप्रकरणी ट्रम्प यांना कमाल 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या म्हणण्यानुसार, तिने 2006 मध्ये डोनाल्ड ट्रम्पसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी मेलानियाशी लग्न केले होते. मात्र, ट्रम्प यांनी नेहमीच हे आरोप फेटाळून लावले आहेत.
2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांना लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी, मायकेल कोहेनच्या माध्यमातून त्यांनी डॅनियलला सत्य उघड न करण्यासाठी अंदाजे एक कोटी रुपये दिले होते.