Donald Trump Dainik Gomantak
ग्लोबल

Abu Bilal al Minuki Killed: इसिसचा टॉप कमांडर अल-मिनुकी खल्लास, अमेरिकन सैन्याकडून सफाया; ट्रम्प यांनी दिली माहिती

ISIS Global Second In Command Eliminated: जागतिक दहशतवादी संघटना इसिसचा (ISIS) दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी याला नायजेरियामध्ये कंठस्नान घालण्यात आले.

Manish Jadhav

Abu Bilal al Minuki Killed: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका मोठ्या लष्करी कारवाईची घोषणा केली असून जागतिक दहशतवादी संघटना इसिसचा (ISIS) दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी याला नायजेरियामध्ये कंठस्नान घालण्यात आले. अमेरिकन लष्कर आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी अत्यंत गुप्तपणे आणि संयुक्तपणे राबवलेल्या एका विशेष मोहिमेत ही मोठी यशस्विता मिळाली.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर या कारवाईची माहिती देताना सांगितले की, त्यांच्या थेट आदेशावरुनच या गुंतागुंतीच्या आणि पूर्वनियोजित मोहिमेची आखणी करण्यात आली होती. अल-मिनुकी हा आफ्रिकेत लपून आपले जागतिक दहशतवादी नेटवर्क चालवत होता, परंतु अमेरिकन गुप्तचर संस्था त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होत्या.

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या यशस्वी मोहिमेबद्दल दोन्ही देशांच्या शूर सैनिकांचे विशेष कौतुक केले. अल-मिनुकीच्या मृत्यूमुळे आता आफ्रिकेतील निष्पाप जनतेवरील दहशतवादाचे सावट कमी होईल आणि अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या आगामी घातपाती कारवायांना पूर्णपणे लगाम बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कारवाईमुळे इसिसच्या जागतिक पातळीवरील ऑपरेशन्सना आणि त्यांच्या नेटवर्कला खूप मोठा फटका बसला. या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेत मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल ट्रम्प यांनी नायजेरिया सरकारचे जाहीर आभार मानले असून, "गॉड ब्लेस अमेरिका" म्हणत आपल्या सैनिकांच्या शौर्याला दाद दिली.

अबू-बिलाल अल-मिनुकी, ज्याला 'अबू बक्र इब्न मुहम्मद इब्न अली अल-मैनुकी' या नावानेही ओळखले जात होते, हा इसिसचा जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खतरनाक दहशतवादी होता. त्याचे मुख्य ठाणे आफ्रिकेतील 'साहेल' (Sahel) क्षेत्रात होते. साहेल हा आफ्रिका खंडातील अटलांटिक महासागरापासून ते पार तांबड्या समुद्रापर्यंत तब्बल 5900 किलोमीटर लांबीचा एक निम-ओसाड भाग आहे. हा परिसर उत्तरेकडील विस्तीर्ण सहारा वाळवंट आणि दक्षिणेकडील दमट सुदानियन सव्हाना यांना एकमेकांपासून वेगळा करतो.

या साहेल क्षेत्रामध्ये सेनेगल, मॉरिटानिया, माली, बुर्किना फासो, नायजर, नायजेरिया, चाड आणि सुदान यांसारख्या प्रमुख देशांसह गॅम्बिया, गिनी, कॅमेरुन आणि इरिट्रिया अशा एकूण 12 देशांच्या सीमांचा समावेश होतो. इतक्या मोठ्या आणि दुर्गम भूप्रदेशातून अल-मिनुकी आपले नेटवर्क चालवत होता.

अल-मिनुकी हा प्रामुख्याने 'इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रोव्हिन्स' (ISWAP) चा वरिष्ठ कमांडर म्हणून सक्रिय होता. याशिवाय, इसिसच्या 'जनरल डिरेक्टोरेट ऑफ प्रोव्हिन्सेस' (GDP) अंतर्गत येणाऱ्या लेक चाड विभागाच्या सर्व दहशतवादी कारवायांचे थेट संचालन आणि नियोजन त्याच्याच इशाऱ्यावर चालत असे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन गोळा होणारा दहशतवादी निधी विविध दहशतवादी गटांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना थेट मार्गदर्शन करणे, यामध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती.

त्याची हीच भयंकर पार्श्वभूमी लक्षात घेऊन, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून 2023 मध्येच त्याला अधिकृतपणे 'विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी' (Terrorist) म्हणून घोषित केले होते. त्याचा हा खात्मा म्हणजे जागतिक दहशतवादविरोधी लढ्यातील एक ऐतिहासिक आणि अत्यंत मोठी कामगिरी मानली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT