Donald Trump: युद्धाच्या सावटात ट्रम्प यांचं 'थँक्यू' मिशन! 800 कैद्यांची फाशी रोखल्यानं अमेरिकेच्या भूमिकेत मोठा बदल; इराणवरील हल्ल्याच्या चर्चेला फाटा

Donald Trump Thanks Iran: व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या निर्णयाचे कौतुक केले.
Donald Trump
Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump Thanks Iran: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करु शकते, अशी चर्चा जागतिक स्तरावर सुरु होती. मात्र, शुक्रवारी (16 जानेवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अनपेक्षित पाऊल उचलत इराण सरकारचे आभार मानले. इराणने 800 हून अधिक राजकीय कैद्यांची फाशी रद्द केल्याचा दावा करत ट्रम्प यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

ट्रम्प खूश

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या या निर्णयाचे कौतुक केले. ते म्हणाले, "इराणने 800 हून अधिक लोकांची फाशी रद्द केली. त्यांनी हा निर्णय घेतल्याबद्दल मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो. ही एक मोठी गोष्ट आहे." ट्रम्प यांनी केवळ पत्रकारांशी बोलतानाच नव्हे, तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही इराण सरकारचे आभार मानले. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी निदर्शने झाली होती. या निदर्शनांदरम्यान अटक करण्यात आलेल्या शेकडो लोकांना इराण सरकार फाशी देणार असल्याची चर्चा होती. मात्र, ट्रम्प यांच्या दाव्यानुसार इराणने आता आपला निर्णय बदलला.

Donald Trump
Donald Trump: "मीच नाटोचा तारणहार!" डोनाल्ड ट्रम्प यांचा जागतिक राजकारणात नवा धमाका; ग्रीनलँडवर फडकणार अमेरिकेचा झेंडा?

हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर मवाळ भूमिका

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा वेगळा अंदाज जगाला थक्क करणारा आहे. कारण, याच ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणला लष्करी हल्ल्याची धमकी दिली होती. "जर इराण सरकारने आंदोलकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले किंवा त्यांची हत्या केली, तर अमेरिका शांत बसणार नाही आणि लष्करी कारवाई करेल," असे संकेत ट्रम्प यांनी दिले होते. मात्र, आता इराणमधील निदर्शने शांत झाली असून कैद्यांची फाशी रोखल्याने ट्रम्प यांनी 'थँक यू' म्हणत नरमाईची भूमिका घेतली.

Donald Trump
Donald Trump Warship: ट्रम्पचा धमाका! तयार करणार जगातील सर्वात मोठी युद्धनौका; वाचा थरकाप उडवणारी माहिती

हल्ल्याबाबत ट्रम्प यांचे गूढ वक्तव्य

पत्रकारांनी जेव्हा ट्रम्प यांना विचारले की, त्यांनी यापूर्वी मदतीबाबत दिलेले संकेत अजूनही लागू आहेत का? त्यावर ट्रम्प यांनी "बघूया" (Let's see) असे गूढ उत्तर दिले. तसेच, इराणबाबत घेतलेला हा सकारात्मक निर्णय कोणाच्या दबावाखाली घेतला आहे का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी स्पष्ट केले की, "मला कोणत्याही अरब किंवा इस्रायली अधिकाऱ्याने प्रभावित केलेले नाही. हा निर्णय घेण्यासाठी मी स्वतःलाच राजी केले."

गुप्तचर माहितीवर प्रश्नचिन्ह?

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 800 लोकांची फाशी रद्द झाल्याचा दावा केला असला तरी त्यांनी आपल्या माहितीचा स्रोत उघड केलेला नाही. इराणमधील (Iran) मानवाधिकार संघटना किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांनी अद्याप इतक्या मोठ्या प्रमाणावर फाशी रद्द झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे ट्रम्प यांना मिळालेली ही गुप्तचर माहिती किती अचूक आहे, याबाबत आता तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com