Flood In South Africa Twitter
ग्लोबल

दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन शहरात महापुर, 340 हून अधिक लोकांचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहर आणि पूर्वेकडील क्वाझुलु-नताल प्रांतात मुसळधार पाऊसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. आणि पुरामुळे (Flood) जनजीवन विस्कळीत झाले असून, किमान 340 लोकांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Flood In South Africa)

संततधार पावसामुळे प्रांतात शोकांतिका पसरली आहे, घरे कोसळली आहेत, अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे आणि महत्त्वाचे रस्ते वाहून गेले आहेत. त्याचवेळी, अनेक कुटुंबे अद्याप बेपत्ता असल्याने येत्या काही दिवसांत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे 52 दशलक्षचे नुकसान

इथाक्विनीचे महापौर मॅकिलोसी कुंडा यांनी गुरुवारी सांगितले की डर्बन आणि आसपासच्या इथाक्विनी महानगर क्षेत्रात सुमारे 52 दशलक्षाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. किमान 120 शाळा पुराच्या पाण्याने वाहून गेल्या आहेत, ज्याचे अंदाजे 26 दशलक्षपेक्षा जास्त नुकसान झाले आहे आणि अधिका-यांनी या कारणांसाठी प्रांतातील शाळा तात्पुरत्या बंद केल्या आहेत.

यासोबतच शिक्षण मंत्री अँजी मोशेगा यांनी सांगितले की, पुरात विविध शाळांचे किमान 18 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे परिसरात शोकांतिका आहे आणि यामुळे भयंकर नुकसान झाले आहे. हा चिंतेचा विषय असून पावसाचा जोर कायम राहणार असून, आधीच बाधित भागातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

प्रशासकीय मदतीचा अभाव

दक्षिण आफ्रिकेतील प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, प्रशासकीय पाठिंब्याअभावी डर्बनच्या रिझर्वोअर हिल्समध्ये निदर्शने करणाऱ्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी 'स्टन ग्रेनेड' वापरला. यावेळी मदत कार्यासाठी 'दक्षिण आफ्रिकन राष्ट्रीय संरक्षण दल' तैनात करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT