रशिया युक्रेन युध्दाच्या (Russia Ukraine Crisis) पार्श्वभूमीवर देशातील आघाडीची आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने रशियामधून आपले कामकाज बंद करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने स्पष्ट केले की, आम्ही रशियातील (Russia) कोणत्याही क्लायंटसोबत काम करणार नाही. त्याच वेळी, आज बंगलोरमध्ये, इन्फोसिसच्या (Infosys) सीईओने माहिती दिली की, ''कंपनीने रशियामधून ऑपरेशन्स संपुष्टात आणण्यास सुरुवात केली आहे. आम्ही रशिया सोडून इतर देशांमध्ये ऑपरेशन्स हलवत आहेत.'' दुसरीकडे मात्र इन्फोसिसचे हे पाऊल भारत सरकारच्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. अमेरिकेच्या दबावानंतरही भारताने रशियाशी असलेले आर्थिक संबंध तोडलेले नाहीत. मात्र, युरोप आणि अमेरिकेतील (America) इन्फोसिसचा व्यवसाय पाहता कंपनीला या प्रकरणात कोणताही धोका पत्करायचा नाही. यासोबतच कंपनीने युक्रेनमध्ये (Ukraine Crisis) मदतकार्यासाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे.
इन्फोसिसची कार्यालये रशियातून स्थलांतरित होत आहे
कंपनीचे सीईओ सलील पारेख यांनी आज माहिती दिली आहे की, ''कंपनी रशियामधील आपले कामकाज थांबवत आहे. तसेच इतर देशांमध्ये असलेल्या केंद्रांमध्ये हे ऑपरेशन्स हलवण्यात येत आहे.'' त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीचे रशियामध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत. पारेख यांनी स्पष्ट केले की, 'आम्ही सध्या कोणत्याही रशियन क्लायंटसोबत काम करत नाहीत.' त्याचबरोबर ब्रिटनमधील सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दहा लाख डॉलर्सचा निधी दिला जात असल्याची माहिती पारेख यांनी दिली. त्याचवेळी रशियातील कामकाज बंद झाल्यामुळे इन्फोसिसवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पारेख यांनी म्हटले आहे. जगातील आघाडीच्या आयटी कंपन्यांसाठी अमेरिका, युरोप, ब्रिटन ही मोठी बाजारपेठ आहे. विशेष म्हणजे तिन्ही देश रशियावर निर्बंध लादत आहेत. जगभरातील अनेक कंपन्यांनी रशियामधील त्यांचे कामकाज थांबवले आहे. यातच आता इन्फोसिसनेही रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
चौथ्या तिमाहीचा नफा 5,686 कोटी रुपयांवर पोहोचला
इन्फोसिसने कालच चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या तिमाहीत तिने 5,686 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 12 टक्के अधिक आहे. मात्र, तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यात 2 टक्क्यांची घट झाली आहे. यासह, गेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी, 2020-21 च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या नफ्यात 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.