Congo Mine Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Congo Landslide: 'कांगो'मध्ये निसर्गाचा महाप्रलय! मुसळधार पावसानं डोंगराचा कडा कोसळून 200 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये मुलांचाही समावेश VIDEO

Congo Mine Accident: पूर्व कांगोमधील उत्तर किवू प्रांतात निसर्गाचा एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक कोप पाहायला मिळाला.

Manish Jadhav

Congo Mine Accident: पूर्व कांगोमधील उत्तर किवू प्रांतात निसर्गाचा एक अत्यंत भयानक आणि हृदयद्रावक कोप पाहायला मिळाला. येथील रुबाया कोल्टन खाण क्षेत्रात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे अनेक खाणीत हाहाकार उडाला असून या दुर्घटनेत आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक लोक अडकले असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

28 जानेवारी, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराचा भाग खाणींवर कोसळला आणि ही खळबळ उडाली. या दुर्घटनेत केवळ खाण कामगारांचाच जीव गेला नाही, तर तिथे जवळच असलेल्या बाजारपेठेत काम करणाऱ्या महिला आणि निरागस मुलांचाही मोठ्या संख्येने बळी गेला.

M23 या विद्रोही गटाच्या नियंत्रणाखाली असलेल्या या परिसरात सध्या बचावकार्य सुरु असले तरी, चिखल आणि ढिगाऱ्यामुळे त्यात मोठे अडथळे येत आहेत. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 227 पर्यंत पोहोचली असण्याची शक्यता आहे. काही लोकांना जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले असून त्यांच्यावर स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार सुरु आहेत. यातील गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेने गोमा शहरात नेण्याची तयारी सुरु आहे.

रुबाया हे क्षेत्र कोल्टन उत्पादनासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. जगभरातील कोल्टनच्या एकूण उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन याच भागातून होते. हे खनिज स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारख्या प्रगत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, मात्र तिथे काम करणाऱ्या मजुरांची सुरक्षा नेहमीच वाऱ्यावर असते.

या भीषण दुर्घटनेनंतर विद्रोही गटाने नियुक्त केलेल्या प्रशासनाने या भागातील खाणकामावर तात्पुरती बंदी घातली असून, खाणींच्या जवळ असलेल्या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. पूर्व कांगोमध्ये गेल्या अनेक दशकांपासून हिंसाचार आणि अस्थिरतेचे वातावरण आहे.

सरकारी सैन्य आणि विद्रोही गटांमधील संघर्षामुळे या खनिजसमृद्ध भागातील मजुरांना अत्यंत धोकादायक परिस्थितीत काम करावे लागते. पावसाळ्यात भूस्खलन (Landslide) होणे ही इथे मोठी समस्या आहे, मात्र गरिबीमुळे हजारो मजूर आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ काही डॉलर्ससाठी या मृत्यूच्या सापळ्यात काम करत असतात. या ताज्या दुर्घटनेने तेथील भीषण मानवी संकटाचे वास्तव पुन्हा एकदा जगासमोर आणले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Politics: नितीन नवीन भाजपचे 'बिग बॉस', मुख्यमंत्री सांवतांकडून कौतुकाचा वर्षाव; आगामी निवडणुका जिंकण्याचा केला निर्धार

Goa Accident: झोप ठरली जीवघेणी...! ट्रक खाली झोपलेल्या अज्ञात व्यक्तीचा चिरडून मृत्यू; करासवाडा येथील घटनेनं हादरला गोवा

Seaweed Forests: गोव्याच्या किनाऱ्यावर 'समुद्री शेवाळाची जंगले' आहेत, ही जाणीव लोकांमध्ये निर्माण व्हायला हवी..

Crime News: घरातच बनवली 'स्मशानभूमी'! आई-वडिलांना मारुन मुलानं घरातच गाडलं; बहिणीच्या प्रेमप्रकरणातून संपवलं संपूर्ण कुटुंब

SCROLL FOR NEXT