Congo: काँगोत बंडखोरांचा हैदोस, 130 नागरिक ठार; 22 महिलांवर बलात्कार...

Congo News: 22 महिला आणि पाच मुलींवर बलात्कार करण्यात आला.
Congo
CongoDainik Gomantak
Published on
Updated on

Democratic Republic Of The Congo: काँगोच्या पूर्वेकडील भागामध्ये (DRC), M23 बंडखोरांनी 17 महिला आणि 12 मुलांसह 130 नागरिकांचा बळी घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे मुख्य प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी गुरुवारी सांगितले की, “आठ लोकांना गोळ्या घालून जखमी करण्यात आले, तर 60 लोकांचे अपहरण करण्यात आले आहे. यासोबतच 22 महिला आणि पाच मुलींवर बलात्कार करण्यात आला.'' ते पुढे म्हणाले की, "आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, पीडितांना गोळ्या आणि चाकूने मारण्यात आले आहे."

दरम्यान दुजारिक पुढे म्हणाले की, “युनायटेड नेशन्स मिशन, मोनुस्को म्हणून ओळखले जाते. 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी उत्तर किवू प्रांतातील रुत्शुरु प्रदेशातील किशिशे आणि बांबो या गावांमध्ये नागरिकांवर (Citizens) झालेल्या हल्ल्यांबाबत प्राथमिक तपासणी केल्यानंतर याची पुष्टी करण्यात आली आहे.''

Congo
Free Condoms : या देशात कंडोम आणि गर्भनिरोधक मिळणार फ्री! 'हे' आहे कारण

ते पुढे असेही म्हणाले की, "संयुक्त राष्ट्र शांति मिशन नागरिकांवरील या हिंसाचाराचा तीव्र शब्दात निषेध करते आणि पीडितांना आपत्कालीन मानवतावादी मदत पुरविण्याचे आवाहन करते. मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु करण्याच्या कॉंगोच्या (Congo) अधिकाऱ्यांच्या निर्णयाचे मिशन स्वागत करते."

Congo
Global Condom Market: जगभरात कंडोम मार्केट वधारणार; भारत,चीनमधुन अधिक मागणी

शेवटी ते म्हणाले की, 'पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी मिशन तयार आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com