Osama Bin Laden Dainik Gomantak
ग्लोबल

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

Osama Bin Laden target India Before US: अमेरिकेची गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सी अर्थात 'सीआयए' ने एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक गुप्तचर अहवाल सार्वजनिक केला.

Manish Jadhav

CIA Declassified Report9/11 Attack 25th Anniversary: अमेरिकेवर झालेल्या 9/11च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला 25 वर्षे पूर्ण होत असतानाच अमेरिकेची गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी अर्थात 'सीआयए' ने एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक गुप्तचर अहवाल सार्वजनिक केला. 100 हून अधिक पानांच्या या अधिकृत दस्तऐवजांमध्ये अल-कायदा आणि त्याचा प्रमुख ओसामा बिन लादेनच्या संदर्भात अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे करण्यात आले आहेत.

न्यू यॉर्कमधील ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त करण्यापूर्वी अल-कायदा आणि ओसामा बिन लादेनच्या हिटलिस्टवर अमेरिका नव्हे तर भारत (India) होता. अमेरिकेवर हल्ला करण्यापूर्वी लादेनने भारतात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मालिका घडवून आणण्याची कटकारस्थाने रचली होती. मात्र, नंतर रणनीती बदलून त्याने आधी अमेरिकेला लक्ष्य केले, ज्याच्या परिणामी पुढे अमेरिकन सैन्याने पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला.

अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्यासाठी सीआयएने 1998 मध्ये हा विशेष गोपनीय अहवाल तयार केला होता. 28 ऑगस्ट 1998 रोजी अंतिम स्वरुप देण्यात आलेल्या या अहवालाचे शीर्षक ‘बिन लादेन टेररिस्ट नेटवर्क स्टील अ थ्रेट’ असे होते. या अहवालात लादेनने दहशतवादी हल्ल्यांची आखणी केलेल्या आणि अल-कायदाच्या प्राधान्यक्रमावर असलेल्या सर्व प्रमुख देशांची यादी देण्यात आली होती.

त्या दस्तऐवजांनुसार, ओसामा बिन लादेनच्या निशाण्यावर भारत, इजिप्त, कुवेत, सौदी अरेबिया, येमेन, पाकिस्तान, युगांडा आणि नायजेरिया हे देश होते. याशिवाय, ब्रिटनवरही मोठा हल्ला घडवून आणण्यासाठी लादेनने जगभरातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरलेल्या आपल्या नेटवर्कला अलर्ट राहण्याचे आदेश दिले होते.

अहवालात नमूद केल्यानुसार, ऑगस्ट 1998 मध्ये केनिया आणि टांझानियामधील अमेरिकन दूतावासांवर झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर अमेरिकेने अफगाणिस्तान आणि सुदानमधील अल-कायदाच्या ठिकाणांवर क्रूझ क्षेपणास्त्रांनी भीषण हल्ले चढवले होते. त्या हल्ल्यातून लादेन आणि त्याचे मुख्य सहकारी थोडक्यात वाचले होते. सीआयएच्या या नव्या दस्तऐवजांवरुन स्पष्ट होते की, 9/11च्या तीन वर्षे आधीच अमेरिकेला लादेनच्या भारतविरोधी मनसुब्यांची माहिती मिळाली होती, जरी भारतातील विशिष्ट लक्ष्यांची संपूर्ण माहिती त्यावेळी समोर आली नव्हती.

11 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी चार विमानांचे अपहरण करुन न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवर्सवर आणि पेंटॅगॉनवर थेट धडक दिली होती. या अभूतपूर्व दहशतवादी हल्ल्यात सुमारे 3000 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या नृशंस हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई करत तालिबान आणि अल-कायदाचे नेटवर्क उध्वस्त केले आणि अखेर 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या ॲबटाबादमध्ये विशेष मोहीम राबवून ओसामा बिन लादेनचा खात्मा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT