Uttar Pradesh: यूपीच्या फर्रुखाबाद जिल्ह्यातील विद्युत विभागाचे एसडीओ रवींद्र प्रताप गौतम यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
त्यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावला होता आणि त्यावर 'वर्ल्ड्स बेस्ट इंजिनीअर' असे लिहिले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तपास सुरु करण्यात आला होता.
फर्रुखाबादमध्ये, वीज विभागाच्या एसडीओने त्यांच्या सरकारी निवासस्थानी दहशतवादी ओसामा बिन लादेनचा फोटो लावला होता, ज्यात त्याचे वर्णन जगातील 'वर्ल्ड्स बेस्ट इंजिनीअर' केले होते.
एसडीओच्या निवासस्थानी लावलेला फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत अधिकाऱ्यांनी चौकशी केली. 31 मे 2022 रोजी तपास सुरु झाला आणि आता एसडीओला निलंबित करण्यात आले.
सुमारे 10 महिन्यांच्या तपासानंतर वीज विभागाचे एसडीओ रवींद्र प्रताप गौतम यांना सरकारने दोषी सिद्ध केल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
दुसरीकडे, रवींद्र प्रताप गौतम यांची नवाबगंज इलेक्ट्रिकल सब स्टेशन, फर्रुखाबाद येथे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दहशतवादी ओसामा बिन लादेनचा (Osama bin Laden) फोटो त्यांच्या पॉवर हाउस कॉम्प्लेक्समधील गेस्ट रुममध्ये लावण्यात करण्यात आला होता. त्यावर लिहिले होते, 'वर्ल्ड्स बेस्ट इंजिनीअर'
तसेच, ओसामा बिन लादेनच्या या फोटोचा कोणीतरी व्हिडिओ केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसडीओने हा फोटो काढून टाकला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती मिळताच रवींद्र प्रताप गौतम भूमिगत झाले.
त्यानंतर, व्हायरल व्हिडिओच्या चौकशीनंतर उपविभागीय अधिकारी (एसडीओ) रवींद्र प्रताप गौतम यांना निलंबित करण्यात आले.
10 महिन्यांच्या तपासानंतर आता उपविभागीय अधिकारी (एसडीओ) रवींद्र प्रकाश गौतम यांना दोषी मानून सरकारने त्यांना बडतर्फ केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.