Buddha Dainik Gomantak
ग्लोबल

Egypt: इजिप्तमध्ये सापडली भगवान बुद्धाची प्राचीन मूर्ती, भारताविषयी अनेक मोठी गुपिते...!

Egypt: इजिप्तमध्ये एका मंदिराच्या उत्खननात भगवान बुद्धाची प्राचीन मूर्ती सापडली आहे. बुद्धाची ही मूर्ती दुसऱ्या शतकातील सांगितली जात आहे.

Manish Jadhav

Egypt: इजिप्तमध्ये एका मंदिराच्या उत्खननात भगवान बुद्धाची प्राचीन मूर्ती सापडली आहे. बुद्धाची ही मूर्ती दुसऱ्या शतकातील असल्याचे सांगितले जात आहे.

या शोधावरुन असे मानले जाते आहे की, भारत आणि रोमन साम्राज्य यांच्यात व्यापारी संबंध होते. बुद्धाची ही प्राचीन मूर्ती 71 सेमी उंच आहे. तसेच, मूर्तीच्या जवळ एक कमळाचे फूल दिसते.

दरम्यान, इजिप्तमधील लाल समुद्राजवळील बेरेनिस या प्राचीन पोर्टमध्ये सापडलेल्या भगवान बुद्धाच्या मूर्तीवरुन भारत त्यावेळी किती समृद्ध होता आणि भारताचे (India) व्यापारी संबंध उत्तर आफ्रिकन देशांशी असायचे हे दिसून येते.

त्याचवेळी, बौद्ध धर्माचा प्रसार दक्षिण आणि पूर्व आशिया तसेच पश्चिमेकडील इजिप्त या आफ्रिकन देशामध्ये झाला होता, हे देखील यावरुन समजते.

या शोधामुळे भारत आणि रोमन साम्राज्यतील व्यापारी संबंधांचे संकेत मिळाले

इजिप्तच्या पुरातन वास्तू मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एका अहवालानुसार पोलिश-अमेरिकन मिशनला बेरेनिस येथील प्राचीन मंदिरात उत्खननादरम्यान रोमन काळातील पुतळा सापडला आहे.

इजिप्तच्या पुरावशेष परिषदेचे प्रमुख मुस्तफा एल वझीरी म्हणाले की, या शोधामुळे रोमन काळात इजिप्त (Egypt) आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंधांच्या अस्तित्वाचे महत्त्वाचे संकेत मिळाले.मूर्तीची उंची 71 सेमी आहे.

दरम्यान, उजव्या पायाचा काही भाग नसलेल्या या पुतळ्याची उंची 71 सेमी आहे. वझीरी सांगतात की, बेरेनिस हे रोमन काळातील इजिप्तमधील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक होते.

संस्कृतमध्ये लिहिलेला शिलालेखही सापडला

उत्खननादरम्यान, रोमन सम्राट मार्कस ज्युलियस फिलिप्सचा 'इ.स. 244 ते 249 पर्यंतचा' शिलालेखही सापडला आहे. जो संस्कृत भाषेत आहे. वास्तविक, इजिप्त कोरोना नंतर आपले पर्यटन पुनरुज्जीवित करण्यात गुंतला आहे. कारण कोरोनामुळे इजिप्शियन पर्यटनाचे खूप नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT