Egypt's Golden Boy Mummy
Egypt's Golden Boy MummyDainik Gomantak

Egypt's Golden Boy Mummy: सोन्याची जीभ, हृदय..., 2300 वर्षे जुनी इजिप्शियन ममी बघून लोकं झाले अचंबित

Magic Amulets Inside Egyptian Golden Boy Mummy: इजिप्त हा असा देश आहे, ज्यात भूतकाळातील अनेक गूढ रहस्ये आहेत.

Magic Amulets Inside Egyptian Golden Boy Mummy: इजिप्त हा असा देश आहे, ज्यात भूतकाळातील अनेक गूढ रहस्ये आहेत. जे वेळोवेळी जुन्या शवपेट्या उघडून प्रकट होतात. यावेळी 2300 वर्ष जुन्या मुलाची शवपेटी उघडण्यात आली आहे. ज्याच्या आत अशा गोष्टी सापडल्या आहेत, ज्या सर्वांना आश्चर्यचकित करत आहेत.

समाधीमध्ये 21 वेगवेगळ्या डिझाईन्सचे 49 ताबीज सापडले आहेत. यासोबतच मृत्यूनंतरचे मार्गदर्शन करण्यासाठी सोन्याचा मुखवटा, तोंडात सोन्याची जीभ आणि छातीत सोन्याचे हृदय सापडले आहे. यास मृत्यूनंतरचे जीवन म्हणतात.

दरम्यान, संशोधकांना मृत मुलाच्या (Child) ममीवर आणि शरीराच्या आत ताबीज सापडले आहेत. ताबीज कुठे आहे हे शोधण्यासाठी संगणक टोमोग्राफी स्कॅनचा वापर करण्यात आला आहे. 19व्या आणि 20व्या शतकात सर्व ममी इजिप्तमधील (Egypt) कैरो येथील संग्रहालयात पाठवण्यापूर्वी अनेक शवपेटीही उत्खनन करण्यात आल्या होत्या. जरी शास्त्रज्ञ प्राचीन मानवांबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी शोध घेत आहेत.

Egypt's Golden Boy Mummy
China: चीनमधील 'हा' अब्जाधीश झाला कंगाल, विकावी लागली तब्बल 93 टक्के संपत्ती!

शास्त्रज्ञांना काय शोधायचे आहे?

सीएनएनच्या वृत्तानुसार, त्यांचा उद्देश प्राचीन काळातील लोकांचे आरोग्य कसे होते, त्यांचे अंत्यसंस्कार कसे केले जात होते आणि ते कोणत्या परंपरा पाळत होते हे जाणून घेणे आहे. यासाठी शवपेट्या जमिनीतून बाहेर काढल्या जातात, त्यानंतर त्याबद्दल जाणून घेतले जाते.

दुसरीकडे, आजकाल अधिक माहितीसाठी सीटी स्कॅनचा वापर केला जातो. या सोनेरी मुलाचे अवशेष दोन शवपेट्यांमध्ये ठेवण्यात आले होते. बाहेरील ताबूत सामान्य होते. विशेष म्हणजे, ग्रीक अक्षरांनी कोरलेला होते.

Egypt's Golden Boy Mummy
China Economic Growth Rate: चीनी अर्थव्यवस्थेला मोठा फटका, 50 वर्षांतील दुसऱ्या...!

तसेच, मृत्यू (Death) झाला तेव्हा मुलाचे वय 14 ते 15 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच डोक्याला सोन्याचा टोप आहे. बनावट हृदय आणि मेंदू व्यतिरिक्त त्याच्या शरीरात इतर कोणतेही अवयव आढळले नाहीत. उर्वरित अवयव बाहेर काढण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com