Egypt Economic Crisis: पाकिस्तानपाठोपाठ इजिप्त आर्थिक संकटात, अंडी बनली लक्झरी वस्तू; कठीण काळात भारतच...!

Egypt: आफ्रिका आणि अरब देश यांच्यामध्ये वसलेल्या या देशाचे चलन आता सर्वात निचांकी पातळीवर आले आहे.
Egypt
EgyptDainik Gomantak
Published on
Updated on

Egypt Economic Crisis: आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात जनता बेहाल झाली आहे. यातच आता एका पाकिस्तानी वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, येत्या 72 तासांत पाकिस्तानला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. हे कर्ज चीनमधील एका बॅकेचे आहे. यामुळे परकीय चलनाचा साठा चार अब्ज डॉलरच्या खाली जाईल.

दरम्यान, पाकिस्तानप्रमाणेच इजिप्तलाही (Egypt) सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आफ्रिका आणि अरब देश यांच्यामध्ये वसलेल्या या देशाचे चलन आता सर्वात निचांकी पातळीवर पोहोचले आहे.

इजिप्शियन वर्तमानपत्रांमध्ये छापले जाणारे लेख देशातील आर्थिक संकटावर प्रकाश टाकत आहेत. महागाईने होरपळत असलेल्या जनतेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अंडी ही आता अनेक सामान्य जनतेसाठी लक्झरी वस्तू बनली आहे. एक स्वप्न बनलेले मांस सर्वसामान्य जनतेच्या प्लेट्समधून पूर्णपणे गायब झाले आहे.

Egypt
Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानला चीनकडून झटका! डोस्कच धरुन बसले 'शाहबाज', 72 तासात...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील मध्यमवर्ग शाळेची फी आणि वैद्यकीय खर्चाच्या ओझ्याखाली दबला आहे. “याक्षणी, आम्ही दुरुन काहीही पाहू शकत नाही,” कैरोमधील 30 वर्षीय सरकारी अधिकारी माई अब्दुलघानी म्हणाल्या. त्यांचे पती डिझाईन इंजिनिअर आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांना चार ठिकाणी नोकरी करावी लागत आहे. माई पुढे म्हणाल्या की, 'प्रत्येक वेळी सुपरमार्केटमध्ये जाताना मला अनेक प्रश्न सतावतात.'

मुस्लिम देश मदत करत नाहीत

रशिया-युक्रेन युद्धामुळे इजिप्तवर संकट ओढवले आहे. जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा रशियन आणि युक्रेनियन पर्यटक, जे एका वेळी इजिप्तला जाणाऱ्या सर्व पर्यटकांपैकी एक तृतीयांश होते, आता ते अचानक गायब झाले आहेत.

याशिवाय, गव्हाचा पुरवठा, ज्यावर बहुतांश लोकसंख्या अवलंबून होती, तो देखील विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर, परकीय गुंतवणूकदारांनी 20 अब्ज डॉलर्स घेऊन इजिप्त सोडले. मुस्लिम देश संकटाच्या वेळी इजिप्तच्या पाठीशी उभेही नाहीत, हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा झटका आहे.

Egypt
Pakistan Economic Crisis: जगाकडे भीक मागुनही फायदा नाही; आता केवळ मोदींचाच आधार

कठीण काळात भारताने दिली साथ

एकाकी पडलेल्या इजिप्तला त्याच्या कठीण काळात मदत करण्यासाठी भारत (India) पुढे आला आहे. भारतातून इजिप्तला गव्हाचा पुरवठा केला जात आहे. एवढेच नाही तर इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांचा भारत दौरा दिल्ली आणि कैरोला जवळ आणेल. पीएम मोदींसोबत त्यांची चर्चा कृषी, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रावर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com