Joe Biden & Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

China Vs America: तैवान करणार अमेरिकेकडून शस्त्र खरेदी, ड्रॅगन म्हणाला...

Joe Biden & Xi Jinping: डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (DCSA) ने दोन्ही देशांमधील कराराची पुष्टी करणारे निवेदन जारी केले आहे.

दैनिक गोमन्तक

China Vs America: चीनसोबतच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये अमेरिकेने तैवानला हार्पून आणि साइडविंडर क्षेपणास्त्रांसह जवळपास USD 1.1 अब्ज डॉलरच्या शस्त्रास्त्र विक्रीला शुक्रवारी मंजुरी दिली आहे. डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी (DCSA) ने दोन्ही देशांमधील कराराची पुष्टी करणारे निवेदन जारी केले आहे. त्याचवेळी ड्रॅगनने अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध केला आहे.

दरम्यान, DSCA ने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकन परराष्ट्र खात्याने तैवानच्या (Taiwan) संरक्षण विभागाचे आधुनिकीकरण करण्यासाठी सुमारे $355 दशलक्ष हार्पून ब्लॉक II क्षेपणास्त्रे आणि संबंधित उपकरणे विकण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, स्टेट डिपार्टमेंटने जवळपास $85.6 दशलक्षसाठी साइडविंडर्स क्षेपणास्त्रे (Missiles) आणि संबंधित उपकरणांच्या विक्रीला मान्यता दिली आहे. तसेच, US$ 665.4 दशलक्ष किमतीचे पाळत ठेवणारी रडार यंत्रणा आणि उपकरणांच्या विक्रीलाही मान्यता देण्यात आली आहे.

दुसरीकडे, DCSA ने असेही म्हटले आहे की, प्रस्तावित करारामुळे प्रदेशातील मूलभूत लष्करी संतुलन बदलणार नाही. हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानच्या वादग्रस्त भेटीवरुन वॉशिंग्टन आणि बीजिंग यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे.

हार्पून आणि साइडविंडर्सची वैशिष्ट्ये

हार्पून ही जहाजविरोधी होमिंग क्षेपणास्त्रे आहे, जे बोईंगने किनाऱ्यावरील पाण्याच्या क्षमतेसह उत्पादित केली आहेत. दुसरीकडे, साइडविंडर्स हे रेथिऑनने विकसित केलेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहेत, ज्यात प्रक्षेपणानंतर लक्ष्य लॉक करण्याची क्षमता आहे.

चोख प्रत्युत्तर देईल: चीन

अमेरिकेच्या या निर्णयाला चीनने विरोध केला आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाने स्पुतनिकला सांगितले की, 'चीन (China) याला प्रत्युत्तर देईल.' शस्त्रास्त्र पॅकेजबद्दल विचारले असता चिनी दूतावासाचे प्रवक्ते लिऊ पेंग्यू म्हणाले, "चीनने या डिलचा कडाडून विरोध केला आहे. चीन त्याविरुद्ध कायदेशीर आणि आवश्यक प्रतिकारात्मक उपाय करेल."

प्रवक्त्यांनी पुढे असेही म्हटले की, 'अमेरिका चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत आहे. तैवानला शस्त्र विक्री करुन अमेरिका चीनच्या सार्वभौमत्वाला आव्हान देत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT