America measles infection rise X
ग्लोबल

USA Measles Outbreak: अमेरिकेत गोवरचा प्रादुर्भाव! 1992 नंतर प्रथमच प्रसार; रुग्णसंख्या एक हजारवर

America Measles Outbreak: ‘सीडीसी’च्या आकडेवारीनुसार १९९२ नंतर प्रथमच येथे गोवरचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यावेळी दोन हजार १२६ जणांना गोवरची लागण झाली होती.

Sameer Panditrao

वॉशिंग्टन: अमेरिकेत गोवरचा संसर्ग वाढत असून एक हजार २८८ रुग्णांची नोंद झाली असल्याचे ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन’ संस्थेने नुकतीच दिली. बालपणात होणाऱ्या या आजाराचे अमेरिकेतून २००० मध्ये उच्चाटन झाल्यापासून हे सर्वाधिक प्रमाण आहे.

जेव्हा एका वर्षापेक्षा जास्त काळ एखाद्या आजाराचा सतत प्रसार होत नाही, तेव्हा त्याचे उच्चाटन झाल्याचे जाहीर केले जाते. ‘सीडीसी’च्या आकडेवारीनुसार १९९२ नंतर प्रथमच येथे गोवरचे सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यावेळी दोन हजार १२६ जणांना गोवरची लागण झाली होती.

‘सीडीसी’चे कामकाज पाहणाऱ्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येसाठी गोवर संसर्गाचा धोका कमी आहे, परंतु गोवरचा प्रादुर्भाव असलेल्या भागात कमी लसीकरण असलेल्या समूहांमध्ये हा धोका जास्त आहे. त्यामुळे लशींना मान्यता देण्याचे आवाहन तज्ज्ञांनी सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना केले. गोवर, गालगुंड आणि रुबेलावरील (एमएमआर) लस दोन डोसनंतर ९७ टक्के प्रभावी ठरते.

प्रसार कमी पण..

मे महिन्यात देशात गोवरच्या रुग्णांची संख्या एक हजारच्या पुढे गेली आहे. त्यानंतर संसर्गाचा प्रसार कमी झाला असला तरी, तो आजूबाजूच्या राज्यांमध्ये पोहोचला आहे. रुग्णांचा चढता आलेख सध्या खाली उतरला असला तरी पुढे तो कसा राहील, याचा अंदाज वर्तविणे कठीण आहे, ‘जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चे बालरोगतज्ज्ञ विल्यम मॉस म्हणाले.

विल्यम मॉस (बालरोगतज्ज्ञ, जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ)

जर रुग्णांची वेगाने संख्या वाढत राहिली तर अमेरिकेचा गोवर निर्मूलनाचा दर्जा गमावण्याचा धोका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT