Job Scam: 'कार्गो शिप'मध्ये नोकरी देतो म्हणून पाठवले USA ला, शिकागोत उतरल्यावर झाली अटक; गोव्याचा तरुणाला 5 लाखांचा गंडा

Ajay Shirodkar Job Scam: शिरोडकर याच्या विरोधात इस्तिबेरो या युवकाने मायणा कुडतरी पोलिसात तक्रार देऊन खोटी कागदपत्रे तयार करून आपल्याला अमेरिकेत पाठवून पाच लाखांचा गंडा घातला, असा आरोप केला आहे.
Ajay Shirodkar job scam USA Goa
Goa cargo ship job scamDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: अमेरिकेत नोकरी देण्याच्या बहाण्याने गोव्यातील काही युवकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रँचमध्ये गुन्हा नोंद झालेल्या अजय शिरोडकर याच्या विरोधात गिर्दोळी सालसेट येथील मिलाग्रीस इस्तिबेरो या युवकाने मायणा कुडतरी पोलिसात तक्रार देऊन खोटी कागदपत्रे तयार करून आपल्याला अमेरिकेत पाठवून पाच लाखांचा गंडा घातला, असा आरोप केला आहे.

अजय शिरोडकर याचे शिरोडकर ओशन एम्पायर नावाची रिकृटिंग कंपनी असून एप्रिल २०२१मध्ये आपल्याला ''व्हेट स्काय'' या कार्गो बोटीवर नोकरी देण्याच्या बहाण्याने आपल्याकडून ५ लाख घेतले. मात्र खोटी कागदपत्रे घेऊन प्रवास केल्याच्या आरोपावरून आपल्याला शिकागो विमानतळावर अटक करून नंतर परत भारतात पाठविण्यात आले, असे या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणा संदर्भात मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक अरुण गावस देसाई यांना विचारले असता अशा प्रकारची तक्रार आपल्या ठाण्यात देण्यात आली आहे. त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

तक्रारदार इस्तिबेरो यांना विचारले असता, आपण आधी प्रिन्सेस क्रूझ या शिपवर कामाला होतो. मात्र वडिलांचे निधन झाल्यामुळे मी गोव्यात आलो. लगेच महिनाभरात माझी आईही वारली त्यामुळे मी माझ्या कामावर जॉईन होऊ शकलो नाही. त्यानंतर मला कुणीतरी शिरोडकर याचे नाव सांगितल्यावर मी त्याच्याशी संपर्क साधला.

Ajay Shirodkar job scam USA Goa
US Job Fraud: अन्न-पाणी नाही, मेक्‍सिकोचे जंगल, अमेरिकन सैनिकांची गस्‍त; गोव्यातून परदेशात नोकरीसाठी गेलेल्यांची कशी झाली फसवणूक?

''व्हेट स्काय'' या कार्गो शिपवर काम मिळवून देतो असे सांगून सांगून आपल्याकडून ५ लाख रुपये घेतले. ही शिप अमेरिकेला आहे, असे सांगून मला शिकागोला पाठविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात ती बोट मेक्सिको येथे नांगरून ठेवली. शिकागो विमानतळावर उतरल्यावर मला बनावट कागदपत्रे तयार करून पाठविण्यात आल्याचे कळून चुकले. तिथे मला अटक करून पुन्हा भारतात पाठविण्यात आले. या सर्व भानगडीत माझे सीडीसी कार्डही रद्द करण्यात आले. त्यामुळे आज मी बेकार ठरलो आहे असे त्यांनी सांगितले.

Ajay Shirodkar job scam USA Goa
US Job Fraud: बनावट दस्तावेज देऊन अमेरिकेत नोकरीला पाठवले! लाखोंची अफरातफर; 3 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मंगळवारी सुनावणी

दरम्यान अजय शिरोडकर आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांवर क्राईम ब्रँचमध्ये जी तक्रार नोंद झाली आहे त्यात आपल्याला अटक होईल या भीतीने शिरोडकर याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून हा अर्ज मंगळावर १० जून रोजी उत्तर गोवा सत्र न्यायालयासमोर सुनावणीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com