Ayatollah Ali Khamenei & Donald trump Dainik Gomantak
ग्लोबल

America Iran Tension: "तुमच्या युद्धनौकांना समुद्रात गाडून टाकू!" ट्रम्प यांच्या आक्रमकतेवर खामेनेईंचा पलटवार; इराणची अमेरिकेला थेट विनाशाची ताकीद

Ayatollah Ali Khamenei Warning To America: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाच्या वळणावर येऊन पोहोचला.

Manish Jadhav

Ayatollah Ali Khamenei Warning To America: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाच्या वळणावर येऊन पोहोचला असून मध्यपूर्वेत युद्धाचे ढग गडद होऊ लागले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला थेट इशारा दिला. त्यांच्याकडे असे हत्यार आहे जे अमेरिकेच्या अजस्त्र युद्धनौका एका क्षणात नष्ट करु शकते, असे खामेनेई म्हणाले.

अमेरिकेने इराणच्या दिशेने आपले सर्वात मोठे विमानवाहू युद्धपोत आणि लढाऊ विमाने रवाना केल्याच्या पार्श्वभूमीवर इराणकडून ही आक्रमक प्रतिक्रिया आली आहे. खामेनेई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकेला डिवचले असून त्यांनी 'यूएसएस गेराल्ड आर. फोर्ड' ही युद्धनौका पाण्यात बुडाल्याचे आणि तिथे थडगे असल्याचा एक प्रतीकात्मक फोटो पोस्ट करुन आपली लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसरीकडे, अमेरिकेने देखील आक्रमक पवित्रा घेत गेल्या 24 तासांत 50 हून अधिक अत्याधुनिक लढाऊ विमाने मध्यपूर्वेत तैनात केली आहेत. यामध्ये एफ-22, एफ-35 आणि एफ-16 सारख्या घातक विमानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दीर्घकाळ लष्करी मोहीम चालवण्यासाठी आवश्यक असलेले हवाई इंधन भरणारे टँकर्सही अमेरिकेने पाठवले आहेत, जे युद्धाच्या पूर्वतयारीचे संकेत मानले जात आहेत.

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने इराणच्या दिशेने युद्धनौका पाठवल्याची घोषणा केल्यामुळे खामेनेई यांनी त्यांच्यावर टीका केली. खामेनेई यांच्या मते, युद्धनौका धोकादायक असल्या तरी त्यांना समुद्रात बुडवणारे इराणचे शस्त्र त्यापेक्षाही जास्त शक्तीशाली आहे.

लष्करी तणाव वाढत असतानाच दुसरीकडे ओमानच्या मध्यस्थीने जिनिव्हा येथे दोन्ही देशांमध्ये दुसऱ्या फेरीची राजनैतिक चर्चाही सुरु आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ही चर्चा सकारात्मक असल्याचे म्हटले असले तरी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनी स्पष्ट केले की इराण अजूनही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आखून दिलेल्या 'रेड लाइन्स' पाळायला तयार नाही. यामुळेच वाटाघाटींचा पेच अधिक वाढला आहे.

एकीकडे राजनैतिक मार्ग शोधले जात असताना दुसरीकडे दोन्ही देशांनी आपली लष्करी सिद्धता वाढवली आहे. इराणने (Iran) दिलेली ही ताकीद आणि अमेरिकेने केलेली प्रचंड विमान तैनाती यामुळे येत्या काही दिवसांत मध्यपूर्वेत युद्धाचा मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT