Iran America Tension: 'आत्ताच्या आत्ता देश सोडा...' ईराणमध्ये उडणार युद्धाचा भडका? ट्रम्प यांच्या धमकीनंतर अमेरिकेचा अल्टीमेटम

Donald Trump: अमेरिकेने ईराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना ‘त्वरित’ देश सोडण्याचा गंभीर इशारा दिला आहे.
Donald Trump & Ali Khamenei
Donald Trump & Ali KhameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Iran America Tension: ईराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ईराणमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना ‘त्वरित’ देश सोडण्याचा गंभीर इशारा दिला आहे. ईराणमधील ‘व्हर्च्युअल अमेरिकन दूतावासाने’ जारी केलेल्या या ॲडव्हायजरीमध्ये असे स्पष्ट करण्यात आले की, संपूर्ण ईराणमध्ये सध्या कमालीची अशांती आणि अस्थिरता पसरलेली आहे.

त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी तिथून बाहेर पडण्यासाठी स्वतःची स्वतंत्र व्यवस्था करावी आणि अमेरिकन सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नये. जर विमान उड्डाणे रद्द झाली, तर नागरिकांनी रस्ते मार्गाने आर्मेनिया किंवा तुर्कीची सीमा ओलांडून सुरक्षित स्थळी पोहोचावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

अमेरिकेला (America) भीती आहे की, ईराणमध्ये कधीही इंटरनेट सेवा पूर्णपणे खंडित केली जाऊ शकते, ज्यामुळे नागरिकांशी संपर्क साधणे अशक्य होईल. अशा परिस्थितीत नागरिकांनी पुरेसा अन्नसाठा, पाणी आणि औषधे जमा करुन सुरक्षित इमारतीमध्येच आश्रय घ्यावा. विशेषतः ज्या व्यक्तींकडे अमेरिका आणि ईराण या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे, त्यांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे; कारण ईराण अशा व्यक्तींना केवळ स्वतःचे नागरिक मानून अटक करण्याची शक्यता आहे.

Donald Trump & Ali Khamenei
Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

दुसरीकडे, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ईराणमधील शाब्दिक युद्ध आता थेट लष्करी हल्ल्याच्या धमक्यांपर्यंत पोहोचले आहे. ट्रम्प यांनी आखाती प्रदेशात आपले विशाल समुद्री आरमार तैनात केले असून, याला ‘अर्माडा’ असे संबोधले जात आहे. यामध्ये विमानवाहू युद्धनौका ‘यूएसएस अब्राहम लिंकन’सह अनेक घातक युद्धनौकांचा समावेश असून या नौका जानेवारी महिन्यापासूनच आखाती समुद्रात तळ ठोकून आहेत. एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा ट्रम्प यांना विचारण्यात आले की, ईराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी चिंतेत राहावे का? त्यावर ट्रम्प यांनी अत्यंत कडक शब्दांत उत्तर दिले की, "त्यांनी खूप जास्त चिंतेत राहायला हवे." ईराणमध्ये डिसेंबर 2025 पासून सुरु असलेली निदर्शने दडपण्यासाठी तिथल्या सरकारने जो हिंसाचार केला, त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी भूमिका अमेरिकेने घेतली आहे.

Donald Trump & Ali Khamenei
America Iran Tension: "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची खुली धमकी; सरकारी टीव्हीवर हत्येच्या प्रयत्नाचे फोटो दाखवल्याने खळबळ

मध्यपूर्वेतील या संभाव्य युद्धाची ठिणगी विझवण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यप एर्दोगान सध्या सर्वस्व पणाला लावत आहेत. अमेरिकेची अशी मागणी आहे की, वाटाघाटीमध्ये ईराणच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचाही समावेश असावा, मात्र ईराण केवळ आपल्या अणुकार्यक्रमावरच चर्चा करण्यास तयार आहे. दोन्ही देशांच्या या हट्टामुळे चर्चेची प्रक्रिया कोलमडण्याच्या मार्गावर असून, हवाई हल्ल्याचा धोका कैक पटींनी वाढला आहे. एर्दोगान यांच्या मते, ओमानमध्ये सुरु असलेल्या प्राथमिक स्तरावरील चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी थेट संवाद साधणे आवश्यक आहे. तुर्की सध्या अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावून हा मोठा लष्करी संघर्ष टाळण्यासाठी धडपडत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com