Plane Crash Landing Dainik Gomantak
ग्लोबल

Plane Crash Landing: हवेतून थेट हायवेवर! वाहनांना चिरडत विमानाचं क्रॅश लँडिंग, प्रवाशांचा जीव टांगणीला; थरारक व्हिडिओ व्हायरल

America Plane Emergency Crash Landing: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात एका लहान विमानाला तांत्रिक बिघाडामुळे गजबजलेल्या रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

Manish Jadhav

America Plane Emergency Crash Landing: अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात एका लहान विमानाला तांत्रिक बिघाडामुळे गजबजलेल्या रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले, ज्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. गेन्सविले शहरात घडलेल्या या घटनेत विमानाने धावपट्टीऐवजी रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र यादरम्यान विमानाने अनेक वाहनांना चिरडले. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या विमानाला विमानतळापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याने वैमानिकाला नाईलाजाने हा धोकादायक निर्णय घ्यावा लागला, असे प्राथमिक तपासात समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे एक इंजिन असलेले 'हॉकर बीचक्राफ्ट BE-36' मॉडेलचे प्रशिक्षण विमान होते. हे विमान ली गिल्मर मेमोरियल विमानतळावरुन उड्डाण करुन कॅंटन येथील चेरोकी काउंटी प्रादेशिक विमानतळाकडे जात होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच वैमानिकाला इंजिनमध्ये गंभीर समस्या असल्याचे जाणवले.

वैमानिकाने तात्काळ विमानतळाकडे परत वळण्याचा प्रयत्न केला, परंतु इंजिनची शक्ती वेगाने कमी होत गेल्यामुळे विमान (Plane) धावपट्टीपर्यंत पोहोचू शकले नाही. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या (NTSB) अहवालानुसार, वैमानिकाने अत्यंत धाडसाने 'ब्राउन्स ब्रिज रोड' आणि 'पर्ल निक्स पार्कवे'च्या चौकात विमान उतरवण्याचा निर्णय घेतला.

विमान रस्त्यावर उतरत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, विमान वेगाने रस्त्यावर येते आणि तिथे उभ्या असलेल्या किंवा चालत असलेल्या कारला धडका देऊ लागते. लँडिंगदरम्यान विमानाचे नियंत्रण सुटल्याने त्याचे उजवे विंग एका गाडीला धडकले. या धडकेत विमान आणि ती गाडी या दोघांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रस्त्यावर अचानक विमान उतरल्याचे पाहून वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली.

या अपघातानंतर (Accident) परिसरात एकच गोंधळ उडाला आणि बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. अपघातातील दोन जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अपघातानंतर विमानाला एका मोठ्या ट्रकमधून पुन्हा विमानतळावर नेण्यात आले. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि NTSB या दोन्ही संस्थांनी या घटनेची सखोल चौकशी सुरु केली आहे. विमानाचे इंजिन नेमके का निकामी झाले, वैमानिकाने घेतलेले निर्णय योग्य होते का आणि तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण काय होते, यावर आता अधिक तपास केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT