Afghanistan School Blast Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan School Blast: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातील शाळेत भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू, सुमारे 100 जखमी

Afghanistan Kunar Province School Blast 6 Dead: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात शनिवारी (28 नोव्हेंबर) एका शाळेजवळ मोठा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Afghanistan Kunar Province School Blast 6 Dead: अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात शनिवारी (28 नोव्हेंबर) एका शाळेजवळ मोठा स्फोट झाला असून, या दुर्घटनेत सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास 100 लोक जखमी झाले. असदाबादच्या बाहेरील भागात असलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

प्रांताचे संस्कृती आणि माहिती संचालक समी-उल-हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट सुरुवातीला जवळच्या विस्फोटक साठ्याच्या डेपोमध्ये झाला. मिडिल स्कूललगत (School) असलेल्या एका घरात हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. खाणकामाशी संबंधित लोकांचे हे घर असून, तिथे डायनामाइट साठवून ठेवण्यात आले होते. खाण कंपन्यांच्या विस्फोटक डेपोमध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्फोटानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील बहुतांश जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, काहींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नेमके काय घडले आणि या स्फोटामागील मुख्य कारण काय होते, याचा तपास यंत्रणांकडून सुरु आहे. मात्र, तपासाबाबत अधिक तपशील किंवा या प्रकरणात कोणाला ताब्यात घेतले आहे की नाही, याबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका शाळेच्या आवारातही अशीच धक्कादायक घटना घडली होती. ऑगस्टमध्ये शाळेवर हँडग्रेनेड हल्ला झाल्याची नोंद असून, त्यावेळी 40 पेक्षा अधिक मुले जखमी झाली होती. या पार्श्वभूमीवर शाळा आणि परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: सुख-समृद्धीचे दार उघडणार! डिसेंबरमध्ये गुरु-शनीच्या चालीत बदल; 'या' 3 राशींची होणार भरभराट

Jharkhand Accident: झारखंडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, वाहनाच्या भीषण धडकेत 13 जणांचा मृत्यू; बिहारच्या नालंदावर शोककळा!

Daily Horoscope: मेहनतीचे फळ, प्रवास आणि नवीन संधी...! 'या' राशींसाठी रविवार एकदम खास; जोडीदाराची उत्तम साथ मिळणार

Rohit Sharma Captaincy: 'मी तयार नव्हतो...' रोहित शर्माने मुलाखतीत सांगितली पडद्यामागची रंजक गोष्ट; काय म्हणाला नेमका?

Delimitation Bill 2026: अटी पूर्ण झाल्यास डिलिमिटेशन बिलाला साथ! ए. राजा यांनी स्पष्ट केली DMK ची भूमिका; चेन्नईतील बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT