Pakistan Airstrike Afghanistan: गाढ झोपेत असताना काळाचा घाला! पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर भीषण हवाई हल्ला; लहान मुलांसह 22 ठार

Kunar And Helmand Province Bomb Attack: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. गुरुवारी (1ऑक्टोबर) पहाटे पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेलमंद प्रांतांवर भीषण हवाई हल्ले केले.
Kunar And Helmand Province Bomb Attack
Pakistan Airstrike AfghanistanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pakistan Airstrikes on Afghanistan 2026: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचला आहे. गुरुवारी (1ऑक्टोबर) पहाटे पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेलमंद प्रांतांवर भीषण हवाई हल्ले केले. या लष्करी कारवाईत थेट मानवी वस्त्यांना लक्ष्य करण्यात आले असून, यात लहान मुलांसह तब्बल 22 निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीररित्या जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला हल्ला कुनार प्रांतातील शेल्टन जिल्ह्यातील चोगाम खोऱ्यात झाला. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास जेव्हा येथील नागरिक गाढ झोपेत होते, तेव्हा पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अचानक हल्ले सुरु केले. या तीव्र हल्ल्यात एक घर पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन ढिगाऱ्याखाली गाडले गेले. प्राथमिक अहवालानुसार, या भीषण घटनेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. तसेच या हल्ल्यात दोन महिला आणि एक लहान मूल गंभीर जखमी झाले.

Kunar And Helmand Province Bomb Attack
Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; 3 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

कुनारशिवाय दक्षिण अफगाणिस्तानमधील (Afghanistan) हेलमंद प्रांतातही असेच भयानक हवाई हल्ले करण्यात आले. हेलमंदच्या गरमसिर जिल्ह्यातील सफर भागात पाकिस्तानी सैन्याने नागरिकांची दोन घरे लक्ष्य केल्याचे समोर आले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कमीत कमी 4 नागरिकांचा बळी गेला, तर महिला आणि बालकांसह जवळपास 8 जण गंभीर जखमी झाले.

Kunar And Helmand Province Bomb Attack
Pakistan Khyber Airstrike: खुळ्यांची जत्रा! पाकिस्तानने आपल्याच लोकांवर टाकले 8 बॉम्ब; महिला, मुलांसह 30 जण ठार Video, Photo

या धोकादायक हल्ल्यानंतर परिसरातील स्थानिकांनी आणि मदत पथकांनी तात्काळ ढिगारा उपसण्याचे व अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. कुनार आणि हेलमंदमधील या आक्रमक हवाई हल्ल्यांमुळे दोन्ही शेजारी देशांमधील आधीच ताणलेले संबंध आणखी स्फोटक बनले. सीमेवरील वाढता हिंसाचार आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर दोन्ही देशांमधील राजकीय व सामरिक वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com