Pakistan Airstrikes Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा मोठा हवाई हल्ला! बॉम्बस्फोटांनी हादरलं कंदहार; ड्यूरंड लाईनवर दाटले युद्धाचे ढग VIDEO

Pakistan Airstrikes on Afghanistan Kandahar: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला.
Pakistan Airstrikes on Afghanistan Kandahar
Pakistan Airstrikes AfghanistanDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Airstrikes on Afghanistan Kandahar: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकड्यांनी पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये थेट कंदहार शहराला लक्ष्य करण्यात आले. गुरुवारी (24 सप्टेंबर) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी कंदहार शहरावर भीषण बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही, परंतु स्फोटांचे आवाज इतके प्रचंड होते की, दूरवरच्या परिसरापर्यंत ते ऐकू गेले.

या अचानक झालेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अनेक कुटुंबे जीव वाचवण्यासाठी तो भाग सोडून सुरक्षित स्थळी पलायन करु लागली आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अफगाण सैन्य आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Pakistan Airstrikes on Afghanistan Kandahar
Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; 3 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

तालिबानचे मुख्य प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी सैन्याच्या या कृत्याची माहिती देताना सांगितले की, आज पहाटे कंदहार शहरात झालेल्या साखळी स्फोटांमुळे एकच हाहाकार उडाला. प्रशासनाने तात्काळ पोलिस आणि लष्कराला पाचारण करुन नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. जरी नागरिक जीव वाचवण्यासाठी प्रांत सोडण्यास उत्सुक असले, तरी सरकार, पोलीस आणि सैन्य यंत्रणा त्यांना स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत आहेत.

Pakistan Airstrikes on Afghanistan Kandahar
Pakistan Bomb Blast: पाकिस्तान हादरलं! खैबर पख्तूनख्वामध्ये नमाजादरम्यान रक्ताचा सडा; भीषण आत्मघाती हल्ल्यात 16 ठार, 50 हून अधिक जखमी

तीन दिवसांपूर्वीच म्हणजे 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले, ज्यामध्ये कुनार आणि पक्तिका राज्यांमधील काही ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या ताज्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तीन महिन्यांपूर्वी झालेला युद्धविराम पूर्णपणे संपुष्टात आला असून ड्यूरंड लाईनवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले. पाकिस्ताने दावा केला की, मागील हल्ल्यामध्ये 28 दहशतवादी मारले गेले आणि त्यांचा शस्त्रसाठाही नष्ट झाला.

Pakistan Airstrikes on Afghanistan Kandahar
Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

वास्तविक पाहता, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये ड्यूरंड लाईन आणि 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) या मुद्द्यावरुन दीर्घकाळापासून वाद सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये 2640 किलोमीटर लांबीची ड्यूरंड लाईन ही सीमा आहे, परंतु 1893 मध्ये ब्रिटिशांनी आखलेली ही सीमा अफगाणिस्तान अधिकृत आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मानण्यास तयार नाही. याशिवाय, पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तान भूमीवर टीटीपीच्या दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे, ज्यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील संबंध अत्यंत ताणले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com